मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

हजारो क्रिकेटप्रेमींच्यामध्ये उभे राहून Virat Kohli नन्ह्या वामिकाला तिच्या पहिल्या वाढदिवसाला देणार खास गिफ्ट

हजारो क्रिकेटप्रेमींच्यामध्ये उभे राहून Virat Kohli नन्ह्या वामिकाला तिच्या पहिल्या वाढदिवसाला देणार खास गिफ्ट

first birthday of his daughter vamika

first birthday of his daughter vamika

हजारो क्रिकेटप्रेमींच्यामध्ये उभे राहून विराट वामिकाचा(Virat Kohli daughter vamika) पहिल्या वहिल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणार आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 6 डिसेंबर: विराट कोहलीसाठी (Virat Kohli )11 जानेवारी 2022 चा दिवस खास आहे. कारण त्या दिवशी नन्ही परी वामिकाचा जन्म झाला होता. हजारो क्रिकेटप्रेमींच्यामध्ये उभे राहून विराट वामिकाचा(first birthday of his daughter vamika) पहिल्या वहिल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणार आहे. विराट आपल्या नन्ह्या परीला काय गिफ्ट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

साउथ अफ्रिकेच्या दौऱ्यासाठी नुकतंच टीम इंडियाचे वेळपत्रक जाहिर झाले आहे. 11 जानेवारीपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे. दरम्यान, या सामन्यातच विराट आपल्या चिमुकलीला खास गिफ्ट देणार आहे. त्यावेळी हजारों क्रिकेटचाहते त्या भेटीचे साक्षीदार ठरणार आहेत.

विराट कोहलीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 97 कसोटी सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत त्याने या दौऱ्यातील सर्व सामने खेळल्यास केपटाऊनमध्ये होणारी कसोटी ही त्याच्या कारकिर्दीतील 100वी कसोटी ठरेल. म्हणजेच ते विशेष क्लबमध्ये सामील होतील. आणि विराटचे हेच रेकॉर्ड वामिकाच्या बर्थ डे दिवशी खास ठरेल.

विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 97 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने 27 शतके आणि 27 अर्धशतके केली आहेत. म्हणजेच, त्याने 50 54 वेळा जास्त धावा केल्या आहेत. त्याने नाबाद 254 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली आहे.

मात्र, कोहलीला आतापर्यंत कसोटीत त्रिशतक झळकावता आलेले नाही. सरासरी 51 आहे. पण 2019 पासून कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. अशा स्थितीत त्याला आफ्रिका दौरा संस्मरणीय बनवायचा आहे.

नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:-

पहिली कसोटी 26-31 डिसेंबर 2021 सेंच्युरियन

दुसरी कसोटी 03-07 जानेवारी 2022 जोहान्सबर्ग

तिसरी कसोटी 11-15 जानेवारी 2022 केप टाऊन

पहिली एकदिवसीय 19 जानेवारी 2022 पार्ल बोलंड पार्क

दुसरी वनडे 21 जानेवारी 2022 पार्ल बोलंड पार्क

तिसरी वनडे 23 जानेवारी 2022 केपटाऊन

First published:

Tags: Anushka sharma, Virat anushka, Virat kohli