Home /News /sport /

IND vs SA : ...म्हणून टेस्ट टीमच्या उपकर्णधाराची घोषणा नाही, समोर आलं कारण

IND vs SA : ...म्हणून टेस्ट टीमच्या उपकर्णधाराची घोषणा नाही, समोर आलं कारण

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यात 3 टेस्ट आणि 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे

    मुंबई, 14 डिसेंबर : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यात 3 टेस्ट आणि 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे. 26 डिसेंबरपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. या सीरिजआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईमध्ये नेट प्रॅक्टिसवेळी रोहित शर्माच्या (Rohit Sharma Injured) मांसपेशींना दुखापत झाली. रोहित शर्मा टेस्ट सीरिजमधून बाहेर गेल्यामुळे आता भारतीय टीमचा उपकर्णधार कोण असणार, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आतापर्यंत अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीम इंडियाचा उपकर्णधार होता, पण खराब कामगिरीमुळे त्याच्याऐवजी रोहित शर्माला ही जबाबदारी देण्यात आली, पण तो उपकर्णधार होण्याआधीच दुखापतग्रस्त झाला. यानंतर बीसीसीआयने (BCCI) भारतीय टीमच्या उपकर्णधाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या सीरिजसाठी कोणीही उपकर्णधार नसेल. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये रहाणे टीम इंडियाचा कर्णधार होता. विराट कोहलीने विश्रांती घेतली असल्यामुळे रहाणेला कॅप्टन्सी देण्यात आली होती, पण विराटच्या कमबॅकनंतर आणि रहाणेला दुखापत झाल्यामुळे तो दुसरी टेस्ट खेळू शकला नाही. खराब फॉर्ममुळे रहाणेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यताही कमी आहे, त्यामुळे बीसीसीआय उपकर्णधाराची घोषणा करणार नाही. प्रत्येक टीममध्ये उपकर्णधार महत्त्वाचा असतो. कर्णधार जेव्हा मैदानातून बाहेर जातो किंवा दुखापतग्रस्त होतो, तेव्हा उपकर्णधारच टीमचं नेतृत्व करतो. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात उपकर्णधाराची घोषणा करण्याऐवजी वरिष्ठ खेळाडू किंवा कॅप्टन्सीचा अनुभव असणाऱ्या खेळाडूला ही जबाबदारी देण्यात येऊ शकते. या यादीत आर.अश्विन (R Ashwin) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचं नाव आघाडीवर आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) टीममधला वरिष्ठ खेळाडू असला तरी त्याच्याकडे टीमचं नेतृत्व करण्याचा अनुभव नाही. अश्विन उपकर्णधारपदासाठीचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय टेस्ट टीम विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, प्रियांक पांचाळ, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धीमान साहा, आर अश्चिन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्‍मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्‍मद सिराज
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या