मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : Rishabh Pant चं T20 मधलं स्थान धोक्यात! कोच द्रविडने सांगितली टीमची रणनिती

IND vs SA : Rishabh Pant चं T20 मधलं स्थान धोक्यात! कोच द्रविडने सांगितली टीमची रणनिती

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये (India vs South Africa T20) ऋषभ पंतची (Rishabh Pant) कामगिरी निराशाजनक झाली. या सीरिजमध्ये पंत टीम इंडियाचा (Team India) कर्णधारही होता. 4 मॅचमध्ये त्याला 105.45 च्या स्ट्राईक रेटने फक्त 58 रन करता आले.

पुढे वाचा ...

मुंबई, 20 जून : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये (India vs South Africa T20) ऋषभ पंतची (Rishabh Pant) कामगिरी निराशाजनक झाली. या सीरिजमध्ये पंत टीम इंडियाचा (Team India) कर्णधारही होता. 4 मॅचमध्ये त्याला 105.45 च्या स्ट्राईक रेटने फक्त 58 रन करता आले. त्याच्या या कामगिरीवर अनेक दिग्गजांनी प्रश्नही उपस्थित केले, तसंच टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) पंतचं टीम इंडियातील स्थान धोक्यात आलं आहे, टीममध्ये फॉर्ममध्ये असलेला दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आहे, तसंच केएल राहुलही (KL Rahul) विकेट कीपिंग करू शकतो, हे कारण देण्यात आलं.

एकीकडे ऋषभ पंतवर दबाव वाढत असतानाच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) त्याचा बचाव केला आहे. ऋषभ पंत टीम इंडियाचा अविभाज्य भाग असल्याचं द्रविडने सांगितलं.

इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना द्रविड म्हणाला, 'टीमला पंतकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर आक्रमक भूमिका निभावण्याची अपेक्षा करत आहे. मधल्या ओव्हरमध्ये जेव्हा तुम्ही खेळाडूला आक्रमक बॅटिंग करायला सांगता तेव्हा दोन-तीन मॅचच्या आधारावर निर्णय घेणं कठीण असतं.'

'मला वाटतं पंतने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे, पण त्याची सरासरी चांगली नसली तरी त्याने चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. त्याला हे आणखी पुढे न्यायचं होतं, जसं त्याने तीन वर्षांपूर्वी केलं होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्हाला पंतकडून असे आकडे मिळतील, अशी अपेक्षा आहे. या प्रक्रियेमध्ये काही सामन्यांमध्ये चुका होऊ शकतात,' हे द्रविडने मान्य केलं.

'ऋषभ पंत आमच्या बॅटिंगचा अविभाज्य घटक आहे. त्याच्याकडे पॉवर आहे आणि तो काय करू शकतो, हे आम्हाला माहिती आहे. मधल्या ओव्हरमध्ये डावखुरा बॅट्समन आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याने काही महत्त्वपूर्ण खेळी केल्या आहेत. त्याला स्वत:ला जास्त रन करायच्या होत्या. पुढच्या काही महिन्यांसाठी तो आमच्या महत्त्वाच्या योजनांचा भाग आहे,' अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली.

First published:

Tags: Cricket, Rahul dravid, Rishabh pant, T20 cricket, T20 world cup, Team india