टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं

टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आफ्रिकेला पहिल्या डावात 162 धावांवर गुंडाळून फॉलोऑन दिला. त्यानंतर दुसऱ्या डावात त्यांची अवस्था 8 बाद 132 अशी झाली आहे.

  • Share this:

रांची, 21 ऑक्टोबर :भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना एक डाव आणि 202 धावांनी जिंकला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्या माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फंलदाजांची दाणादाण उडाली. तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेचे 8 ग़डी बाद झाले होते. त्यानंतर चौथ्या दिवशी भारताने फक्त 12 चेंडूत उरलेले दोन गडी बाद करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारतानं याआधीचे दोन्ही कसोटी सामने जिंकले होते. तिसरा सामना जिंकून आफ्रिकेला व्हाइट वॉश दिला.

तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात 497 धावा केल्यानंतर आफ्रिकेला फॉलोऑन दिला. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेची अवस्था तिसऱ्या दिवसअखेर 8 बाद 132 अशी झाली होती. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवशी शमीने 10 धावात 3 तर उमेश यादवने 2 गडी बाद केले. त्यांची अवस्था 5 बाद 36 अशी झाली होती. त्यानंतर जॉर्ज लिंडे (27 धावा), डेन पीट (23 धावा) यांनी डाव सावरला. त्यानंतर थिनिस डी ब्रुइन नाबाद 30 धावा केल्या. त्याच्यासोबत एनरिच नॉर्तझे 5 धावांवर खेळत होते. चौथ्या दिवशी भारताने त्यांचा डाव 133 धावांवर संपुष्टात आणला.

भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. रोहित शर्माचे द्विशतक, अजिंक्य रहाणेचं शतक आणि जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 497 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर फलंदाजीला मैदानात उतरलेल्या आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांत संपुष्टात आला. झुबेर हमजाचे अर्धशतक आणि बावुमा-लिंडे वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

पहिल्या डावात आफ्रिकेची अवस्था 3 बाद 16 अशी झाली होती. त्यानंतर हमजा आणि टेम्बा बावुमा यांनी डाव सावरला. मात्र अर्धशतक झाल्यानंतर हमजाला जडेजाने बाद केलं. त्यानंतर आफ्रिकेची घसरगुंडी उडाली.

भारताकडून पहिल्या डावात उमेश यादवने 3 तक मोहम्मद शमी, शाहबाज नदीम आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारताने आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांत गुंडाळल्यानंतर दुसऱ्या डावातही त्यांची घसरगुंडी उडाली.

बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO एकदा पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: IND VS SA
First Published: Oct 22, 2019 09:42 AM IST

ताज्या बातम्या