स्मिथनं खेळवलं नाही पण धोनीनं संधी दिली, आता टीम इंडियात निवड

स्मिथनं खेळवलं नाही पण धोनीनं संधी दिली, आता टीम इंडियात निवड

सध्या संघात गोलंदाज म्हणून खेळणार असला तरी धोनी त्याच्या फलंदाजीनं प्रभावित झाला होता.

  • Share this:

मुंबई, 14 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. यासाठी टी20 संघात राजस्थानचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरची निवड झाली आहे. त्यानं विंडीज दौऱ्यातही जबरदस्त कामगिरी केली होती. चाहरनं आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती. दहा वर्षांपूर्वी त्यानं घरेलू क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.

आंध्र प्रदेशविरुद्ध पहिल्याच सामन्यात त्यानं एका डावात 8 गडी बाद केले होते. मात्र, त्यानंतर दुखापतीमुळे रणजी संघात स्थान मिळालं नव्हतं. चेन्नई सुपर किंग्ज आणि एमएस धोनीमुळे त्याचं नशीब बदललं. एका मुलाखतीत त्यानं सांगितलं होतं की, 2016 मध्ये रायझिंग पुणे सुपर जायंटच्या सराव सामन्यात धोनीनं त्याला पहिल्यांदा बघितलं आणि तिथून कारकिर्दीला सुरुवात झाली.

धोनी चाहरच्या गोलंदाजीनं नाही तर फलंदाजीनं प्रभावित झाला होता. पुणे संघाकडून खेळायचं होतं मात्र दुखापतीमुळं खेळू शकला नव्हता. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली दीपक चाहरला संधी मिळाली नव्हती. आयपीएल 2017 मध्ये पुणे अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाले तेव्हा धोनीनं सांगितलं की तु पुढच्या वर्षी चेन्नईकडून खेळण्यासाठी तयारी कर. जेव्हा चेन्नईच्या संघातून खेळलो तेव्हा लोकांच्या नजरेत आलो.

वाचा : भारत दक्षिण आफ्रिका टी20 मालिका रविवारपासून, जाणून घ्या वेळापत्रक

दीपक चाहर आणि त्याचा भाऊ राहुल हे दोघेही टीम इंडियात खेळत आहेत. पहिल्यांदा विंडीज दौऱ्यावर दोघे एकत्र खेळले आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही खेळतील. याबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दीपक चाहर म्हणाला की, खूप छान वाटत आहे. चांगल्या आणि वाईट काळात कुटुंबातील लोकांची साथ असते. राहुलसुद्धा संघात असल्यानं मी माझ्या अडचणी त्याच्याशी शेअर करू शकतो.

भाजप प्रवेशानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: September 14, 2019, 10:02 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading