Home /News /sport /

Umran Malik : वकार युनूस नाही तर हे तीन बॉलर उमरान मलिकचे आयडल, त्यांनाच पाहून शिकला बॉलिंग!

Umran Malik : वकार युनूस नाही तर हे तीन बॉलर उमरान मलिकचे आयडल, त्यांनाच पाहून शिकला बॉलिंग!

सनरायजर्स हैदराबादचा (SRH) फास्ट बॉलर उमरान मलिक (Umran Malik) भविष्यातला स्टार म्हणून समोर आला आहे. या कामगिरीनंतर उमरान मलिकची तुलना पाकिस्तानचा दिग्गज फास्ट बॉलर वकार युनूससोबत (Waqar Younis) होत आहे.

    नवी दिल्ली, 7 जून : सनरायजर्स हैदराबादचा (SRH) फास्ट बॉलर उमरान मलिक (Umran Malik) भविष्यातला स्टार म्हणून समोर आला आहे. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) उमरानने शानदार बॉलिंग करत 14 मॅचमध्ये 22 विकेट मिळवल्या. संपूर्ण मोसमात त्याने 150 किमी प्रती तास आणि त्यापेक्षा जास्तच्या वेगाने बॉलिंग केली, ज्यामुळे तो चर्चेत आला. या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर उमरानची टीम इंडियामध्ये (Team India) निवड झाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी उमरानला टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आलं आहे. उमरान मलिकच्या बॉलिंगचं क्रिकेट चाहते आणि तज्ज्ञ कौतुक करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ब्रेट ली (Brett Lee) याने मलिकची तुलना पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वकार युनूससोबत (Waqar Younis) केली, यावर आता उमरानने उत्तर दिलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना उमरान म्हणाला, 'मी वकार युनूसला फॉलो केलं नाही. माझी प्रोसेस नॅचरल आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार माझे आयडल आहेत. मी सुरूवातीपासूनच यांना फॉलो करतो.' काय म्हणाला होता ब्रेट ली? 'मी उमरान मलिकचा प्रशंसक आहे. मला वाटतं त्याच्याकडे बॅट्समनना त्रास देण्यासाठीचा वेग आहे. उमरान मलिकला बघून मला वकार युनूस आठवतो,' अशी प्रतिक्रिया ब्रेट ली याने दिली होती. 'माझी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. मला देशासाठी सर्वोत्तम करायचं आहे. टीमने सगळ्या 5 मॅच जिंकाव्या, हे माझं लक्ष्य आहे,' असं उमरान मलिक म्हणाला. भारतीय टीम केएल राहुल (कर्णधार), ऋषभ पंत, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या