मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Team India : दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक-कार्तिकचं कमबॅक, रोहितच्या मित्राला धक्का

Team India : दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक-कार्तिकचं कमबॅक, रोहितच्या मित्राला धक्का

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 5 टी-20 मॅचची सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs South Africa T20 Series) घोषणा करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 5 टी-20 मॅचची सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs South Africa T20 Series) घोषणा करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 5 टी-20 मॅचची सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs South Africa T20 Series) घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई, 22 मे : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 5 टी-20 मॅचची सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs South Africa T20 Series) घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि उमरान मलिक (Umran Malik) यांची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. तर दिनेश कार्तिक याचं तीन वर्षांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाबाहेर गेलेला हार्दिक पांड्याही दक्षिण आफ्रिका सीरिजमधून पुनरागमन करणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी केएल राहुलकडे टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे, पण शिखर धवनची मात्र निवडही करण्यात आलेली नाही. मागच्या वर्षी श्रीलंका दौऱ्यात वनडे आणि टी-20 सीरिजसाठी शिखर धवन टीमचा कर्णधार होता, पण यानंतर त्याची टी-20 टीममध्ये निवडही झाली नाही.

भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 टीम

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

First published:

Tags: South africa, T20 cricket, Team india