IND vs SA T20 Series : मुंबई ड्रग्ज पार्टीत अडकलेल्याचं कमबॅक; आफ्रिकन टीमची निवड
IND vs SA T20 Series : मुंबई ड्रग्ज पार्टीत अडकलेल्याचं कमबॅक; आफ्रिकन टीमची निवड
आयपीएल 2022 (IPL 2022) संपल्यानंतर लगेचच भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 5 टी-20 मॅचची (T20 Series) सीरिज होणार आहे. 9 जून ते 19 जून दरम्यान ही सीरिज खेळवली जाईल, त्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची निवड करण्यात आली आहे.
मुंबई, 17 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) संपल्यानंतर लगेचच भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 5 टी-20 मॅचची (T20 Series) सीरिज होणार आहे. 9 जून ते 19 जून दरम्यान ही सीरिज खेळवली जाईल, त्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची निवड करण्यात आली आहे. टेम्बा बऊमाकडे दक्षिण आफ्रिकेच्या टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. तसंच सध्या आयपीएल खेळत असणाऱ्या बहुतेक खेळाडूंची दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये निवड झाली आहे.
मुंबई इंडियन्सकडून पहिलीच मॅच खेळलेल्या ट्रिस्टन स्टब्सला पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये संधी देण्यात आली आहे. तर डावखुरा फास्ट बॉलर वेन पारनेलचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. आयपीएल 2012 साली वेन पारनेल आणि लेग स्पिनर राहुल शर्मा ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकले होते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाची अजूनही निवड झालेली नाही, पण सीनियर खेळाडूंना या सीरिजसाठी विश्रांती दिली जाईल. तसंच आयपीएल गाजवणाऱ्या युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टी-20 क्रमवारीमध्ये टीम इंडिया पहिल्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपआधी (T20 World Cup) ही सीरिज दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे.
दक्षिण आफ्रिकेची टीम
टेम्बा बऊमा, क्विंटन डिकॉक, रीझा हेन्ड्रीक्स, हेनरिच क्लासीन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्किया, वेन पारनेल, ड्वॅन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी व्हॅन डर डुसेन, मार्को जेनसन
भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजचं वेळापत्रक
9 जून- पहिली टी-20, दिल्ली
12 जून- दुसरी टी-20, कटक
14 जून- तिसरी टी-20, विशाखापट्टणम
17 जून- चौथी टी-20, राजकोट
19 जून- पाचवी टी-20, बँगलोर
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.