Home /News /sport /

IND vs SA T20 : भारताविरुद्धच्या सीरिजआधी आफ्रिकन खेळाडूंची कोरोना 'टेस्ट', पाहा काय आहेत रिपोर्ट

IND vs SA T20 : भारताविरुद्धच्या सीरिजआधी आफ्रिकन खेळाडूंची कोरोना 'टेस्ट', पाहा काय आहेत रिपोर्ट

भारत दौरा सुरू व्हायच्या आधी दक्षिण आफ्रिकन (India vs South Africa T20) खेळाडूंची कोरोना टेस्ट (Covid 19 Test) करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये सगळ्या सदस्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

    नवी दिल्ली, 3 जून : भारत दौरा सुरू व्हायच्या आधी दक्षिण आफ्रिकन (India vs South Africa T20) खेळाडूंची कोरोना टेस्ट (Covid 19 Test) करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये सगळ्या सदस्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी सरावाला सुरूवात केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला 9 जूनपासून सुरूवात होणार आहे. भारतामध्ये खेळताना स्पिनर महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे तबरेज शम्सी आणि केशव महाराज यांनी सरावच्या पहिल्याच दिवशी घाम गाळला. अनुभवी विकेट कीपर क्विंटन डिकॉक नेट जवळ बसून स्पिन बॉलिंग बघत होता. याशिवाय ऑलराऊंडर असलेल्या एडन मार्करम यानेही स्पिन बॉलिंगचा सराव केला. आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळलेला फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर ड्वेन प्रिटोरियसही आफ्रिकेसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. पाच वर्षांनी टीममध्ये कमबॅक करणारा डावखुरा फास्ट बॉलर वेन पार्नेलनेही मोठा स्पेल टाकला. तर रस्सी व्हॅन डर डुसेन प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्या देखरेखीखाली बॅटिंग प्रॅक्टीस करत होता. आयपीएलमधला दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू डेव्हिड मिलर हा मात्र मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करतोय. तो लवकरच टीमशी जोडला जाईल, अशी माहिती आहे. गुरूवारी आरटी पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आफ्रिकन खेळाडू दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात सरावासाठी उतरले. दक्षिण आफ्रिकेची टीम टेम्बा बऊमा, क्विंटन डिकॉक, रिझा हेन्ड्रीक्स, हेनरिक क्लासीन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्किया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टियन स्टब्स, रस्सी व्हॅन डर डुसेन, मार्को जेनसन भारतीय टीम केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक सीरिजचं वेळापत्रक 9 जून- पहिली टी-20, दिल्ली 12 जून- दुसरी टी-20, कटक 14 जून- तिसरी टी-20, विशाखापट्टणम 17 जून- चौथी टी-20, राजकोट 19 जून- पाचवी टी-20, बँगलोर
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या