Home /News /sport /

IND vs SA : Virat Kohli ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करणार हा आक्रमक खेळाडू!

IND vs SA : Virat Kohli ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करणार हा आक्रमक खेळाडू!

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातली 5 टी-20 मॅचची सीरिज गुरूवारपासून सुरू होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आधी ही सीरिज महत्त्वाची आहे.

    मुंबई, 7 जून : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातली 5 टी-20 मॅचची सीरिज गुरूवारपासून सुरू होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आधी ही सीरिज महत्त्वाची आहे. दक्षिण आफ्रिका सीरिजमधून भारताच्या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी उपलब्ध आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा या खेळाडूंना या सीरिजमधून आराम देण्यात आला आहे. तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर या सीरिजमध्ये विराट कोहलीऐवजी (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) बॅटिंगची संधी मिळू शकते. कोहली बऱ्याच काळापासून तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करत आहे, तसंच तो जगातल्या सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाच्या बॅट्समनपैकी एक आहे. आता विराटच्या गैरहजेरीत श्रेयस अय्यरला ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. श्रेयस अय्यरचं रेकॉर्ड टी-20 मध्ये श्रेयस अय्यरने 36 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 809 रन केले आहेत. भारतीय टीम आणि चाहत्यांना श्रेयस अय्यरकडून या सीरिजमध्ये बऱ्याच अपेक्षा आहेत. आयपीएल 2022 मध्ये श्रेयस अय्यरची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही. तो केकेआरचा कर्णधार होता, पण टीमला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळालं नाही. भारतीय टीम केएल राहुल (कर्णधार), ऋषभ पंत, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक आफ्रिकेनंतर आयर्लंड दौरा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 मॅचची सीरिज झाल्यानंतर भारतीय टीम दोन टी-20 मॅचची सीरिज खेळण्यासाठी आयर्लंडला जाणार आहे. सीरिजच्या दोन्ही मॅच डबलिनमध्ये होतील. वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने या मॅच महत्त्वाच्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Shreyas iyer, South africa, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या