Home /News /sport /

IND vs SA T20 : टीम इंडियाला धक्का, केएल राहुल सीरिजमधून बाहेर, या खेळाडूला मिळाली कॅप्टन्सी

IND vs SA T20 : टीम इंडियाला धक्का, केएल राहुल सीरिजमधून बाहेर, या खेळाडूला मिळाली कॅप्टन्सी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजआधी टीम इंडियाला (India vs South Africa T20) धक्का बसला आहे. या सीरिजसाठी कर्णधार म्हणून निवडण्यात आलेला केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.

    नवी दिल्ली, 8 जून : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजआधी टीम इंडियाला (India vs South Africa T20) धक्का बसला आहे. या सीरिजसाठी कर्णधार म्हणून निवडण्यात आलेला केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. केएल राहुल संपूर्ण सीरिज खेळणार नसल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. गुरूवारी दिल्लीमध्ये होणाऱ्या पहिल्या टी-20 पासून भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजची सुरूवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सीरिजसाठी केएल राहुलला कर्णधार तर ऋषभ पंतला (Rishabh Pant) उपकर्णधार करण्यात आलं, त्यामुळे आता राहुलच्या गैरहजेरीमध्ये ऋषभ पंत टीमचं नेतृत्व करेल, असंही बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं. केएल राहुल टीममध्ये नसल्यामुळे गुरूवारी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि इशान किशन (Ishan Kishan) ओपनिंगला खेळतील. अजूनही टीमने केएल राहुलच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. तसंच केएल राहुलला नेमकी कोणती दुखापत झाली आहे, याबाबतही माहिती मिळू शकलेली नाही. केएल राहुलने त्याच्या नेतृत्वात आयपीएल 2022 मध्ये लखनऊला प्ले-ऑफमध्ये नेलं होतं. राहुल लखनऊचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. 15 सामन्यांमध्ये 51.33 च्या सरासरीने राहुलने 616 रन केले, यात दोन शतकांचा समावेश होता. संपूर्ण स्पर्धेत राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये होता, पण काही वेळा त्याच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. भारतीय टीम ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Kl rahul, Rishabh pant, South africa, Team india

    पुढील बातम्या