Home /News /sport /

IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका T20 वर संकट, मॅच रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका

IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका T20 वर संकट, मॅच रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 9 जूनपासून 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे, पण या सीरिजची कटकमध्ये होणारी दुसरी टी-20 मॅच संकटात सापडली आहे.

    कटक, 3 जून : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 9 जूनपासून 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे, पण या सीरिजची कटकमध्ये होणारी दुसरी टी-20 मॅच संकटात सापडली आहे. कटकमध्ये होणारा हा सामना रद्द करावा यासाठी ओडिशाच्या उच्च न्यायालयात (Odisha High Court) जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे. 12 जून रोजी कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. बाराबती स्टेडियममध्ये 44 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे, पण स्टेडियमची फायर सेफ्टी म्हणजेच आग नियंत्रण सुरक्षा ओडिशा सरकारच्या आग नियंत्रण आणि आग सुरक्षा नियम 2017 ला धरून नाही, असा दावा या जनहित याचिकेमध्ये करण्यात आला आहे. ओडिशाच्या संजय कुमार नाईक यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये ओडिशा सरकार, बीसीसीआय, ओडिशा क्रिकेट असोसिएशन यांच्यासह 12 जणांना पक्षकार करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडिया केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजचं वेळापत्रक 9 जून- पहिली टी-20, दिल्ली 12 जून- दुसरी टी-20, कटक 14 जून- तिसरी टी-20, विशाखापट्टणम 17 जून- चौथी टी-20, राजकोट 19 जून- पाचवी टी-20, बँगलोर
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या