Home /News /sport /

IND vs SA T20 : लागोपाठ 13वी मॅच जिंकून टीम इंडिया करणार विश्वविक्रम! कुठे पाहाल Live Streaming

IND vs SA T20 : लागोपाठ 13वी मॅच जिंकून टीम इंडिया करणार विश्वविक्रम! कुठे पाहाल Live Streaming

भारतीय टीम केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात गुरूवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa T20 Series) 5 टी-20 मॅचची सीरिज खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे.

    नवी दिल्ली, 8 जून : भारतीय टीम केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात गुरूवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa T20 Series) 5 टी-20 मॅचची सीरिज खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे. टी-20 वर्ल्ड कपआधी (T20 World Cup) नव्या खेळाडूंची तयारी बघण्याची उत्कृष्ट संधी या सीरिजमुळे टीम इंडियापुढे चालून आली आहे. भारताचा मागच्या 12 टी-20 सामन्यांमध्ये विजय झाला आहे, त्यामुळे 13वा सामना जिंकून विश्वविक्रम करण्याची संधी टीम इंडियाला मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या सीनियर खेळाडूंना आराम दिला गेला आहे. रोहितऐवजी केएल राहुलला टीम इंडियाचं कर्णधार करण्यात आलं आहे. राहुलसोबत ओपनिंगला ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) किंवा इशान किशन (Ishan Kishan) यांच्यापैकी एक खेळू शकतो, पण दोघांची आयपीएल 2022 मधली कामगिरी निराशाजनक झाली आहे. विराट आणि सूर्यकुमार यादवच्या गैरहजेरीत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या दीपक हुड्डाकडेही (Deepak Hooda) टीमला दुर्लक्ष करून चालणार नाही. आयपीएलमध्ये लखनऊकडून खेळताना हुड्डाने चांगली कामगिरी केली होती. - गुरूवार 9 जूनला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला सामना होणार आहे. - नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना होईल. - भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली पहिली टी-20 मॅच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. - भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजचं लाईव्ह प्रक्षेपण Star Sports 1, Star Sports 3 आणि Star Gold 2 वर करण्यात येईल. - याशिवाय Disney+ Hotstar app वर मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग बघता येईल. भारतीय टीम केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक दक्षिण आफ्रिकेची टीम टेम्बा बऊमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, रिजा हेन्ड्रिक्स, हेनरिक क्लासीन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनिगिडी, एनरिक नॉर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी व्हॅन डर डुसेन, मार्को जेनसन
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या