मुंबई, 22 मे : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs South Africa) निवड झाली आहे. आयपीएल 2022 मध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांचं टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं आहे. हार्दिक पांड्याने त्याच्या कॅप्टन्सीच्या जोरावर गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) प्ले-ऑफमध्ये पोहोचवलं, तर दिनेश कार्तिकने आरसीबीसाठी (RCB) फिनिशरची भूमिका चोख बजावली. 36 वर्षांच्या कार्तिकने एकट्याच्या जीवावर आरसीबीला बऱ्याच मॅच जिंकवून दिल्या.
दिनेश कार्तिकने त्याची अखेरची टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 27 फेब्रुवारी 2019 ला खेळली होती. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी रविवारी टीम इंडिया जाहीर केली. या सीरिजची पहिली मॅच 9 जूनला दिल्लीमध्ये खेळवली जाणार आहे.
दिनेश कार्तिकने 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 143.52 च्या स्ट्राईक रेटने 399 रन केले आहेत, त्याचा सर्वाधिक स्कोअर 48 रन आहे. आयपीएल 2022 मध्ये कार्तिकने 14 सामन्यांमध्ये 191.33 च्या स्ट्राईक रेटने 287 रन केले. नाबाद 66 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे, तसंच तो 9 वेळा नाबाद राहिला.
2019 वर्ल्ड कपनंतर दिनेश कार्तिक पहिल्यांदाच टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये कार्तिक टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडिया
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजचं वेळापत्रक
9 जून- पहिली टी-20, दिल्ली
12 जून- दुसरी टी-20, कटक
14 जून- तिसरी टी-20, विशाखापट्टणम
17 जून- चौथी टी-20, राजकोट
19 जून- पाचवी टी-20, बँगलोर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, South africa, T20 cricket, Team india