VIDEO : धवनच्या विकेटनंतर बूट लावला कानाला, क्रिकेटमधला विचित्र प्रकार पाहिलात का?

VIDEO : धवनच्या विकेटनंतर बूट लावला कानाला, क्रिकेटमधला विचित्र प्रकार पाहिलात का?

दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू शम्सीने तिसऱ्या टी20 सामन्यात धवनची विकेट घेतल्यानंतर कानाला बूट लावून एक कॉल करून ही गोष्ट त्याच्या आदर्श खेळाडूला सांगितली.

  • Share this:

बेंगळुरू, 24 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या टी20 सामन्यात रविवारी भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. आफ्रिकेनं 9 विकेटनं विजय मिळवून तीन सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवली. दरम्यान, या सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवन बाद झाल्यानंतर एक अनोखा प्रकार बघायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू शम्सीने धवनला बाद केले. त्यानंतर शम्सीनं विचित्र पद्धतीनं जल्लोष केला. त्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.

धवन बाद झाल्यावर शम्सीने बूट काढला आणि कानाला लावला. त्यानं असा प्रकार का केला हे चाहत्यांना न समजल्यानं सगळेच बुचकळ्यात पडले. शम्सीचा सहकारी रासी वॅन डेर दुस्सेननं सामन्यानंतर पत्रकार परिषदेत या कृतीचा खुलासा केला. तिसऱ्या टी20 सामन्यात धवनने पहिल्यांदा शम्सीच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. त्याच्या सलग दोन चेंडूवर षटकार मारले. याची परतफेड करताना शम्सीनं पुढच्याच षटकात धवनला झेलबाद बाद केलं. धवनने 36 धावा केल्या.

शम्सीनं धवनची विकेट घेतल्यानंतर बूट काढून जल्लोष केला. त्यानं बूट कानाला लावून फोन केल्याचं नाटक केलं. सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार रासीने खुलासा केला की, शम्सी महत्त्वाची विकेट घेतली की त्याचा आदर्श इमरान ताहिरला फोन करण्याचं नाटक करतो.

ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण शम्सी नेहमीच इमरान ताहिरला फोन करतो. इमरान त्याच्या आदर्श खेळाडूंपैकी एक आहे. शम्सीसाठी धवनची विकेट घेणं एक मोठी गोष्ट होती. त्यानं अशा पद्धतीनं जल्लोष केला.

वाचा : मेस्सी की रोनाल्डो? फीफाने जाहीर केला सर्वात मोठा पुरस्कार

वाचा : सिंधूला मोठा धक्का, वर्ल्ड चॅम्पियन करणाऱ्या प्रशिक्षकानं सोडली साथ

VIDEO : नॅशनल हायवेवर तरुण करत होता असे भयंकर स्टंट; आता पोलीस घेतायत शोध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 24, 2019 01:37 PM IST

ताज्या बातम्या