मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : पदार्पणातच शतक, पण दक्षिण आफ्रिकेत घाबरला अय्यर, मग द्रविडने दिला सल्ला, VIDEO

IND vs SA : पदार्पणातच शतक, पण दक्षिण आफ्रिकेत घाबरला अय्यर, मग द्रविडने दिला सल्ला, VIDEO

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेन्च्युरियनमध्ये बॉक्सिंग डे टेस्ट (IND vs SA Boxing Day Test) खेळवली जाणार आहे. पण मागच्या महिन्यात टेस्ट पदार्पणातच शतक करणारा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सेन्च्युरियनची हिरवी खेळपट्टी बघून घाबरला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

सेन्च्युरियन, 20 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेन्च्युरियनमध्ये बॉक्सिंग डे टेस्ट (IND vs SA Boxing Day Test) खेळवली जाणार आहे. 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या टेस्टआधी टीम इंडियाने सरावाला सुरुवात केली आहे, पण मागच्या महिन्यात टेस्ट पदार्पणातच शतक करणारा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सेन्च्युरियनची हिरवी खेळपट्टी बघून घाबरला. या खेळपट्टीवर खूप गवत आहे आणि बाऊन्सही जास्त आहे, असं श्रेयस अय्यर म्हणाला. यावर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याने प्रतिक्रिया दिली. पूर्ण जोशाने उत्तम सराव करा, बाकीच्या गोष्टी विसरून जा, असा सल्ला द्रविडने दिला.

बीसीसीआयने (BCCI) याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. 'खेळपट्टीवर जास्त गवत आहे, ज्यामुळे बॅटिंग करणं आव्हानात्मक असेल', असं अय्यर म्हणाला, यानंतर तो फास्ट बॉलर इशांत शर्माजवळ (Ishant Sharma) केला आणि विचारलं की खेळपट्टी बघून तुला काय वाटतं? यावर इशांत उत्तर देताना म्हणाला, 'खेळपट्टीमध्ये ओलावा आहे, बॉल स्विंग होईल. बॅटिंग करणं आव्हानात्मक असेल.'

पहिल्या टेस्टमध्ये दोन्ही टीमच्या बॅटरना फास्ट बॉलिंगचा सामना करावा लागणार हे निश्चित आहे. दक्षिण आफ्रिकेकडे कागिसो रबाडा, एनरिच नॉर्किया यांच्यासारखे दिग्गज फास्ट बॉलर आहेत, जे भारतासाठी अडचणीचे ठरू शकतात. तर भारताकडे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) आहेत, जे विश्रांतीनंतर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहेत. सराव सत्रातही हे दिसून आलं जेव्हा मोहम्मद शमीने विराट कोहलीला बाऊन्सर टाकले.

खेळपट्टी मदत करणारी दिसत असली तरी बॉलर्ससाठी गोष्टी कठीण असतील, कारण लेन्थला खेळपट्टीच्या हिशोबाने बदलावं लागेल, असं भारताचे बॉलिंग प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे म्हणाले. ढगाळ वातावरण आणि थंड हवेमुळे बॅटरना अशा खेळपट्टीवर टिकणं कठीण जाईल, अशी प्रतिक्रिया बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी दिली.

भारताचं सेन्च्युरियनच्या मैदानावरचं रेकॉर्ड खराब आहे. या मैदानात खेळलेल्या दोन्ही टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. 3 वर्षांपूर्वी याच मैदानात दक्षिण आफ्रिकेने भारताचा इनिंग आणि 135 रनने पराभव केला होता. विराट कोहलीने (Virat Kohli) त्या सामन्यात 155 रनची खेळी केली होती, तरीही त्याला भारताचा पराभव टाळता आला नव्हता.

First published:

Tags: Rahul dravid, Shreyas iyer, Team india