Home /News /sport /

IND vs SA : रोहितच्या कमबॅकनंतर टीमबाहेर कोण जाणार? धवनने दिलं उत्तर

IND vs SA : रोहितच्या कमबॅकनंतर टीमबाहेर कोण जाणार? धवनने दिलं उत्तर

करियरमधल्या कठीण काळाने मला आणखी मजबूत बनवलं आहे, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा खेळाडू शिखर धवनने (Shikhar Dhawan) दिली आहे. भारताच्या वनडे टीममधला सगळ्यात वयस्कर खेळाडू असलेल्या शिखर धवनच्या खराब फॉर्मबाबत बऱ्याच चर्चा झाल्या, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये (India vs South Africa) धवनने 79 रन केले.

पुढे वाचा ...
    पार्ल, 20 जानेवारी : करियरमधल्या कठीण काळाने मला आणखी मजबूत बनवलं आहे, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा खेळाडू शिखर धवनने (Shikhar Dhawan) दिली आहे. भारताच्या वनडे टीममधला सगळ्यात वयस्कर खेळाडू असलेल्या शिखर धवनच्या खराब फॉर्मबाबत बऱ्याच चर्चा झाल्या, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये (India vs South Africa) धवनने 79 रन केले. धवनच्या या खेळीनंतरही टीम इंडियाचा पराभव झाला. मॅचनंतर झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये शिखर धवनने वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. 'मी मीडियाचं ऐकत नाही, मी वर्तमानपत्रही वाचत नाही, त्यामुळे मला याबाबत काहीच माहिती मिळत नाही. मला स्वत:वर पूर्ण विश्वास आहे. माझे विचारही स्पष्ट आहेत. मी माझं चित्त शांत ठेवतो. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतातच, त्यामुळे माझ्यासाठी हे नवीन नाही. माझ्या करियरमध्ये पहिल्यांदा आणि अखेरच्या वेळी असं होतं नाहीये. या गोष्टी मला मजबूत करतात,' असं वक्तव्य धवनने केलं. शिखर धवन दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याआधी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळला, पण या पाच सामन्यांमध्ये त्याने शून्य, 12, 14, 18 आणि 12 रन केले. याआधाही जेव्हा धवनला टीमबाहेर करण्याबाबत चर्चा सुरू झाल्या तेव्हा त्याने मोठी खेळी करू टीकाकारांचं तोंड बंद केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्येही धवन भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. 'टीमबाहेर जाण्याच्या गोष्टी कायमच होत असतात. मला याची सवय झाली आहे. मला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे, एवढंच मला माहिती आहे. बाकी सगळं देवावर सोडून देतो. अनुभव आणि आत्मविश्वासामुळे मी चांगली कामगिरी करेन, हे मला माहिती होतं. जोपर्यंत क्रिकेट खेळेन तोपर्यंत फिट राहणं आणि रन करणं गरजेचं आहे,' असं धवन म्हणाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 31 रनने पराभव झाला, पण या खेळपट्टीवर रन करणं कठीण होतं, असं धवनने सांगितलं. खेळपट्टी थोडी संथ होती, तसंच बॉल स्पिनही होत होता. जेव्हा तुम्ही 300 रनच्या आव्हानाचा पाठलाग करत असता आणि मधल्या फळीचे बॅटर मैदानात उतरतात तेव्हा शॉट खेळणं सोपं नसतं. आम्ही जलद विकेट गमावल्या, ज्यामुळे फरक पडला, अशी प्रतिक्रिया धवनने दिली. मर्यादित ओव्हरचा कर्णधार रोहित शर्माचं (Rohit Sharma) टीममध्ये पुनरागमन झाल्यानंतर टीम आणखी मजबूत होईल, असंही धवन म्हणाला. 'रोहित सध्या टीममध्ये नाही. जेव्हा तो पुनरागमन करेल तेव्हा अनुभवी खेळाडू टीममध्ये येईल आणि राहुल मधल्या फळीत खेळल्यामुळे मधली फळीही मजबूत होईल. ज्या युवा खेळाडूंना संधी मिळतेय, त्यांना अनुभवही मिळेल,' असं वक्तव्य धवनने केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rohit sharma, Shikhar dhawan, Team india

    पुढील बातम्या