मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमधून रोहित बाहेर, या खेळाडूला संधी

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमधून रोहित बाहेर, या खेळाडूला संधी

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला (India tour of South Africa) मोठा धक्का बसला आहे. दौऱ्यावर जायच्या आधी मुंबईमध्ये सराव करताना रोहित शर्माला दुखापत (Rohit Sharma Injured) झाली आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला (India tour of South Africa) मोठा धक्का बसला आहे. दौऱ्यावर जायच्या आधी मुंबईमध्ये सराव करताना रोहित शर्माला दुखापत (Rohit Sharma Injured) झाली आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला (India tour of South Africa) मोठा धक्का बसला आहे. दौऱ्यावर जायच्या आधी मुंबईमध्ये सराव करताना रोहित शर्माला दुखापत (Rohit Sharma Injured) झाली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 डिसेंबर : दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला (India tour of South Africa) मोठा धक्का बसला आहे. दौऱ्यावर जायच्या आधी मुंबईमध्ये सराव करताना रोहित शर्माला दुखापत (Rohit Sharma Injured) झाली आहे, त्यामुळे रोहित तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमधून बाहेर झाला आहे. रोहित शर्माऐवजी टीममध्ये प्रियांक पांचाळ (Priyank Panchal) याचा समावेश करण्यात आला आहे. टेस्ट सीरिजमधून रोहित शर्मा बाहेर झाला असला तरी तो वनडे सीरिज खेळणार का नाही, याबाबत अजून काहीही स्पष्ट करण्यात आलं नाही. या सीरिजआधीच रोहितला अजिंक्य रहाणेऐवजी टेस्ट टीमचं उपकर्णधार करण्यात आलं होतं.

थ्रोडाऊन स्पेशलिस्ट राघवेंद्रने टाकलेला बॉल रोहितच्या हाताला लागला, यानंतर तो त्रासात दिसला. रोहित शर्मा टेस्ट सीरिजमधून बाहेर झाल्यामुळे आता ओपनिंगला केएल राहुल आणि मयंक अग्रवाल खेळतील. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये मयंक अग्रवालने शतक केलं होतं. तर केएल राहुल दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धची सीरिज खेळू शकला नव्हता.

16 डिसेंबरला टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. सुरुवातीला या दौऱ्यात 3 टेस्ट, 3 वनडे आणि 4 टी-20 मॅच होणार होत्या, पण कोरोनामुळे टी-20 सीरिज रद्द करण्यात आली. प्रियांक पांचाळला अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही, पण त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 100 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 46 च्या सरासरीने 7011 रन केले, यामध्ये 24 शतकं आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होण्याआधी रोहित शर्माला टीम इंडियाची वनडे कॅप्टन्सी सोपावण्यात आली आहे. तर टेस्ट क्रिकेटमध्येही त्याला उपकर्णधार करण्यात आलं आहे. टी-20 मध्ये मागच्याच महिन्यात रोहित कर्णधार म्हणून मैदानात उतरला. भारतीय क्रिकेटमध्ये प्रमोशन मिळाल्यानंतर मात्र लगेचच रोहितला हा धक्का बसला आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडिया 3 टेस्ट आणि 3 वनडे खेळणार आहे. 26 डिसेंबरपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. वनडे टीमची अजून घोषणा करण्यात आलेली नाही.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा , मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.

स्टॅण्डबाय खेळाडू : दीपक चाहर, अरजान नागसवाला, नवदीप सैनी, सौरभ कुमार

First published:

Tags: Rohit sharma, Team india