हिटमॅनची पुन्हा थोडीशी गंमत! द्विशतकानंतर रोहित काय म्हणाला पाहा VIDEO

हिटमॅनची पुन्हा थोडीशी गंमत! द्विशतकानंतर रोहित काय म्हणाला पाहा VIDEO

वर्ल्ड कपवेळी रोहित शर्माने पंत पाहिजे होता ना तर घ्या असं मजेशिर उत्तर पत्रकार परिषदेत दिलं होतं. आता द्विशतकानंतरही त्यानं अशीच फिरकी घेतली होती.

  • Share this:

रांची, 20 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत भारताचा सलामीवीर रोहित शर्माने द्विशतक झळकावलं. या द्विशतकासह त्यानं पुन्हा एकदा आपण कसोटीसाठी फिट असल्याचं दाखवून दिलं. या खेळीनंतर बोलताना रोहित शर्माने पुन्हा एकदा पत्रकारांची फिरकी घेतली. याआधी त्याने वर्ल्ड कपवेळी ऋषभ पंतवरून कमेंट केली होती.

वर्ल्ड कपमध्ये ऋषभ पंतला का खेळवत नाही असं वारंवार म्हटलं जात होतं. जेव्हा त्याला संधी दिली आणि तो अपयशी ठरला तेव्हा पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला होता की, तुम्हाला हवा होता ना पंत तर घ्या. खरंतर बीसीसीआय़ने रोहित शर्माचा अर्धवट व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये रोहितने नंतर पंतची पाठराखण करताना तो शिकतोय आणि त्याला वेळ लागेल आम्हीही असंच खेळत होतो असं म्हटलं होतं. त्यानंतर अनेकदा रोहितने मजेशिर उत्तरं दिली आहेत.

विंडीज दौऱ्यात रोहित शर्माला संधी मिळाली नाही. मात्र आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा त्याने घेतला आणि स्वत:ला सिद्ध करून दाखवल्याचं रोहित म्हणाला. तसेच मला सलामीला फंलदाजी करण्याची संधी होती. मला चांगली कामगिरी करणं भाग होतं. नाहीतर तुम्ही बरंच काही लिहिलं असतं. पण आता चांगलं लिहाल असंही रोहित शर्मा म्हणाला.

रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत 212 धावांची खेळी करत द्विशतक साजरं केलं. यासह त्यानं मायदेशात सर्वाधिक सरासरीने धावा करण्याचा डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मागे टाकला आहे. रोहित शर्माने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत तीन शतकं केली आहेत. यामध्ये एका द्विशतकाचा समावेश आहे. रांचीतील कसोटीत त्यानं 255 चेंडूत 28 चौकार आणि 6 षटकारांच्या सहाय्याने द्विशतक केलं.

भारतीय मैदानावर त्यानं 12 वी कसोटी खेळताना 99.84 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. कमीत कमी दहा कसोटी खेळलेल्या खेळाडूंमध्ये ही सर्वाधिक सरासरी आहे. रोहितनं ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकलं आहे. डॉन ब्रॅडमन यांनी त्यांच्या कारकिर्दीत 33 कसोटीमध्ये 50 डावात 98.22 च्या सरासरीने 4 हजार 322 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने 12 कसोटीत 98.22 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

विंडीजच्या जॉर्ज हेडलीने 10 कसोटीत 77.56 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सरासरीच्या बाबत चौथ्या क्रमांकावर आहे. घरच्या मैदानावर खेळताना त्याने 77.25 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.रोहितनं आतापर्यंत भारतात 12 कसोटीमध्ये 99.84 च्या सरासरीने 1 हजार 298 धावा केल्या आहेत. यात 6 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO एकदा पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 11:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading