रोहित 199 वर अडकला, जोफ्रा आर्चरचं 6 वर्षे जुनं ट्विट झालं व्हायरल

रोहित 199 वर अडकला, जोफ्रा आर्चरचं 6 वर्षे जुनं ट्विट झालं व्हायरल

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने द्विशतक साजरं केलं पण एक धाव हवी असताना उपहारासाठी खेळ थांबवण्यात आला होता. यावेळी जोफ्रा आर्चरचे 6 वर्षांपूर्वीचे ट्विट चर्चेत आले.

  • Share this:

रांची, 21 ऑक्टोबर : भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 212 धावांची खेळी केली. या खेळीसह त्यानं ऐतिहासिक कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेट आणि वनडेमध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्या अगोदर अशी कामगिरी फक्त सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांनी केली आहे. तसेच षटकार मारून द्विशतक करणारा तो भारताचा पहिलाच सलामीवीर ठरला आहे.

दरम्यान, रोहितचं हे द्विशतक आणखी एका कारणामुळे चर्चेत आलं आहे. द्विशतक पूर्ण करण्यासाठी त्याने 255 चेंडू घेतले असले तरी त्यासाठी बराच वेळ लागला. यावरून इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरचं जुनं ट्विट व्हायरल होत आहे.

रोहित शर्मा 199 धावांवर खेळत असतानाच उपहारासाठी खेळ थांबवण्यात आला. फक्त एक धाव हवी असताना खेळ थांबल्यानं रोहितसह सर्वांनाच द्विशतकासाठी प्रतिक्षा करावी लागली. दरम्यान, सोशल मीडियावर पुन्हा एकदा जोफ्रा आर्चरचे ट्विट व्हायरल झाले. हे ट्विट त्याने 8 नोव्हेंबर 2013 ला केला होते. जेवण होईपर्यंत वाट बघू शकत नाही असं ट्विट त्याने तेव्हा केलं होतं. रोहित शर्माच्या द्विशतकाबद्दलही असंच चाहत्यांचं मत झालं होतं.

जोफ्रा आर्चर सोशल मीडियावर आणि त्यातही ट्विटरवर अॅक्टिव्ह असतो. वर्ल्ड कपवेळी तर त्याचे जुनेच ट्विट प्रत्येक सामन्यावेळी व्हायरल होत होते. चार ते पाच वर्षापूर्वीच त्यानं वर्ल्ड कपचं भाकित केलं होतं अशी चर्चाही रंगली होती.

रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत 212 धावांची खेळी करत द्विशतक साजरं केलं. यासह त्यानं मायदेशात सर्वाधिक सरासरीने धावा करण्याचा डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मागे टाकला आहे. रोहित शर्माने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत तीन शतकं केली आहेत. यामध्ये एका द्विशतकाचा समावेश आहे. रांचीतील कसोटीत त्यानं 255 चेंडूत 28 चौकार आणि 6 षटकारांच्या सहाय्याने द्विशतक केलं.

भारतीय मैदानावर त्यानं 12 वी कसोटी खेळताना 99.84 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. कमीत कमी दहा कसोटी खेळलेल्या खेळाडूंमध्ये ही सर्वाधिक सरासरी आहे. रोहितनं ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकलं आहे. डॉन ब्रॅडमन यांनी त्यांच्या कारकिर्दीत 33 कसोटीमध्ये 50 डावात 98.22 च्या सरासरीने 4 हजार 322 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने 12 कसोटीत 98.22 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO एकदा पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 12:38 PM IST

ताज्या बातम्या