रोहितनं क्रिकेटच्या 'डॉन'ला टाकलं मागे, 'ही' कामगिरी करणारा चौथा खेळाडू

रोहितनं  क्रिकेटच्या 'डॉन'ला टाकलं मागे, 'ही' कामगिरी करणारा चौथा खेळाडू

भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक साजरं करत अनेक विक्रम मोडले.

  • Share this:

रांची, 20 ऑक्टोबर : भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत 212 धावांची खेळी करत द्विशतक साजरं केलं. यासह त्यानं मायदेशात सर्वाधिक सरासरीने धावा करण्याचा डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मागे टाकला आहे. रोहित शर्माने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत तीन शतकं केली आहेत. यामध्ये एका द्विशतकाचा समावेश आहे. रांचीतील कसोटीत त्यानं 255 चेंडूत 28 चौकार आणि 6 षटकारांच्या सहाय्याने द्विशतक केलं.

भारतीय मैदानावर त्यानं 12 वी कसोटी खेळताना 99.84 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. कमीत कमी दहा कसोटी खेळलेल्या खेळाडूंमध्ये ही सर्वाधिक सरासरी आहे. रोहितनं ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकलं आहे. डॉन ब्रॅडमन यांनी त्यांच्या कारकिर्दीत 33 कसोटीमध्ये 50 डावात 98.22 च्या सरासरीने 4 हजार 322 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने 12 कसोटीत 98.22 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

विंडीजच्या जॉर्ज हेडलीने 10 कसोटीत 77.56 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सरासरीच्या बाबत चौथ्या क्रमांकावर आहे. घरच्या मैदानावर खेळताना त्याने 77.25 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.रोहितनं आतापर्यंत भारतात 12 कसोटीमध्ये 99.84 च्या सरासरीने 1 हजार 298 धावा केल्या आहेत. यात 6 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

एकदिवसीय आणि कसोटीत 200 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहितचं नाव जोडलं गेलं आहे. याआधी फक्त चौघांनी अशी कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांनी दोन्ही प्रकारात द्विशतक केलं आहे.

रोहित शर्मा हा भारताकडून क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक साजरं करणारा पहिला सलामीवीर ठरला आहे. तर सलामीवीर म्हणून खेळताना पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ यांनी अशी कामगिरी केली आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये शतक करणारा रोहित शर्मा भारताचा पहिला सलामीवीर ठरला आहे. रोहितने कसोटी पदार्पणातही शतक साजरं केलं होतं. याशिवाय गेल्या दहा वर्षांत शतक साजरं करताना चार षटकार मारणारा रोहित शर्मा भारताचा पहिलाच सलामीवीर ठरला आहे.

अरे हा तर चमत्कार! सामन्यात कॅच पकडताना दिसला सुपरमॅन, पाहा LIVE VIDEO

नाणेफेकीत दोन कर्णधारांना हरवल्यावर विराटला आवरलं नाही हसू, पाहा VIDEO

SPECIAL REPORT : शरद पवारांची 'ही' सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 04:41 PM IST

ताज्या बातम्या