रोहितच्या द्विशतकानंतर भारताची घसरगुंडी, पहिला डाव घोषित

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा सलामीवीर रोहित शर्माने द्विशतक तर अजिंक्य रहाणेनं शतकी खेळी केली.

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2019 03:10 PM IST

रोहितच्या  द्विशतकानंतर भारताची घसरगुंडी, पहिला डाव घोषित

रांची, 20 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात भारताचा सलामीवर रोहित शर्माने द्विशतक आणि अजिंक्य रहाणेनं शतक साजरं केलं. पहिल्या दिवसाच्या 3 बाद 224 धावांवरून डावाची सुरुवात करताना अजिंक्य रहाणेनं शतक साजरं केलं. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 11 वं शतक आहे. दरम्यान, दुसरीकडे रोहित शर्मा कसोटीत पहिलं द्विशतक करताना नाट्यमय घडामोडी घडल्या. त्याला द्विशतकासाठी एक धाव हवी असताना उपहारासाठी खेळ थांबवण्यात आला. तेव्हा भारताच्या 4 बाद 357 धावा झाल्या होत्या. रोहित शर्मा 199 धावांवर तर जडेजा 15 धावांवर नाबाद होता. रोहितने शतकाप्रमाणेच द्विशतकसुद्धा षटकार मारून साजरं केलं. त्यानंतर लगेच रोहित शर्मा बाद झाला.

रोहित बाद झाल्यानंतर जडेजा आणि साहाने संघाच्या 400 धावा फलकावर लावल्या. त्यानंतर संघाची घसरगुंडी उडाली. रोहितचं द्विशतक झालं तेव्हा भारताच्या 4 बाद 363 धावा झाल्या होत्या. त्यानंतर भारताची अवस्था 9 बाद 482 अशी झाली होती. जडेजाने अर्धशतक आणि उमेश यादवने मारलेल्या 5 षटकारांमुळे भारताची धावसंख्या 450 च्या वर गेली. भारताने पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित केला. पहिल्या दिवशी भारताने 3 बाद 224 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रहाणेनं शतक तर रोहित शर्मानं द्विशतक साजरं केलं. हे त्याचं कसोटी क्रिकेटमधील पहिलंच द्विशतक आहे. रहाणे 115 धावांवर बाद झाला. त्याला डेन पीटनं बाद केलं. दक्षिण आफ्रिकेकडून जॉर्ज लिंडेनं 4 आणि रबाडाने 3 गडी बाद केले.

तत्पूर्वी, पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय विराटने घेतला पण चहापानापुर्वीच तीन फलंदाज माघारी परतले. सलामीवीर मयंक अग्रवाल फक्त 10 धावांवर तर चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. त्याच्यानंतर कर्णधार विराट कोहलीला एनरिच नॉर्तजेनं बाद केलं. प्रथम फलंदाजीला मैदानात उतरलेल्या भारताची अवस्था एकवेळ 15.3 षटकांत 3 बाद 39 अशी झाली होती. त्यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी शतकी भागिदारी करून डाव सावरला.

भारतीय संघाने याआधीचे दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. विशाखापट्टणम इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात एक डाव 137 धावांनी मोठा विजय भारतानं साजरा केला. आता रांचीतील कसोटी जिंकून क्लीन स्वीपच्या इराद्याने भारतीय संघ खेळेल.

Loading...

अरे हा तर चमत्कार! सामन्यात कॅच पकडताना दिसला सुपरमॅन, पाहा LIVE VIDEO

नाणेफेकीत दोन कर्णधारांना हरवल्यावर विराटला आवरलं नाही हसू, पाहा VIDEO

SPECIAL REPORT : शरद पवारांची 'ही' सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 03:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...