रोहित शर्माने गेल्या 7 डावांत केलं ते पुण्यात जमलं नाही

रोहित शर्माने गेल्या 7 डावांत केलं ते पुण्यात जमलं नाही

भारताचा हिटमॅन रोहित शर्माने पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शतक झळकावलं होतं.

  • Share this:

पुणे, 11 ऑक्टोबर : भारताचा हिटमॅन रोहित शर्माने कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून सुरूवात करताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शतक केलं. त्यानतंर दुसऱ्या कसोटीत मात्र त्याला पहिल्या डावात 14 धावा कराव्या लागल्या. रोहितला पहिल्या कसोटीतील लय कायम राखता आली नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. भारतीय मैदानात गेल्या 7 डावात प्रत्येकवेळी रोहितने 50 पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. मात्र आठव्या डावात त्याला ही कामगिरी करता आली नाही.

रोहित शर्माने गेल्या 7 कसोटी डावात जबरदस्त फलंदाजी केली आहे. यामध्ये तीन शतकांसह 4 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितने गेल्या 7 डावात 82, 51*, 102*, 65, 50*, 176, 127 अशा धावा काढल्या आहेत. त्याची ही लय 8व्या डावात कायम राहिली नाही. त्याला फक्त 14 धावा करता आल्या.

भारतात कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माची सरासरी 90 पेक्षा जास्त आहे. त्याने आतापर्यंत 11 कसोटी सामन्यात 17 डावात 90.50 च्या सरासरीने 1 हजार 86 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना रोहितनं मायदेशात 5 शतकं केली आहेत. त्याने पदार्पणाच्या सामन्यात 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 177 धावांची खेळी केली होती. रोहित शर्माला कसोटीत आतापर्यंत परदेशात एकही शतक करता आलेलं नाही.

एका कसोटी सामन्यात 9 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहितनं या सामन्यात एकूण 13 षटकार लगावले. रोहितने पहिल्या डावात शतकी खेळी करताना 6 षटकार ठोकले होते. दुसऱ्या डावात 7 षटकार खेचले आहेत. यासह रोहितने सिद्धू यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला. सिद्धू यांनी 1994मध्ये लखनौ कसोटीत श्रीलंकेविरुद्ध 8 षटकार ठोकले होते. तसेच, याआधी पाकिस्तानच्या वसीम अक्रमनं एका कसोटी सामन्यात 12 षटकार ठोकले होते. याचसोबत कसोटी, टी-20 आणि वन-डे अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावे जमा झाला आहे.

मंत्री होण्यासाठी एकाने 20 कोटी मोजले, अजित पवारांची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 08:15 AM IST

ताज्या बातम्या