मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : रोहित वनडे सीरिज खेळणार का नाही? फिटनेसबाबत आली मोठी Update

IND vs SA : रोहित वनडे सीरिज खेळणार का नाही? फिटनेसबाबत आली मोठी Update

Photo-BCCI

Photo-BCCI

भारताच्या वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दुखापतीमुळे रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs South Africa) खेळू शकणार नाही.

मुंबई, 25 डिसेंबर : भारताच्या वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दुखापतीमुळे रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs South Africa) खेळू शकणार नाही. 3 टेस्ट मॅचच्या टेस्ट सीरिजनंतर दोन्ही देशांमध्ये 3 वनडे मॅचची सीरिजही होणार आहे. यासाठी टीम इंडियाची अजून घोषणा झालेली नाही, पण रोहितची वनडे सीरिज खेळण्याची शक्यता वाढली आहे. रोहित शर्माची विराटऐवजी (Virat Kohli) वनडे टीमचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली आहे. फिट झाला तर रोहितची पूर्णवेळ कर्णधार म्हणून ही पहिलीच वनडे सीरिज असेल.

इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मा सुरुवातीची फिटनेस टेस्ट पास झाला आहे. रविवारी त्याच्या आणखी काही टेस्ट केल्या जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्मा फिट दिसत आहे. तो सध्या एनसीएमध्ये असून पहिली टेस्ट पास झाला आहे. रविवारी त्याची शेवटची टेस्ट होऊ शकते. सध्या आम्ही कोणत्याही गोष्टीची घाई करणार नाही, रविवारच्या टेस्टनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असं सूत्रांनी सांगितलं.

डावखुरे स्पिनर आणि ऑलराऊंडर अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनाही दुखापत झालेली आहे. या दोघांच्या बॉलिंगबाबत घाई केली जाणार नाही, कारण ते अजूनही पूर्णपणे फिट नाहीत. तसंही स्पिन बॉलर दक्षिण आफ्रिकेत महत्त्वाची भूमिका निभावत नाहीत, असं अधिकारी म्हणाला. जडेजा आणि पटेल यांची टेस्ट सीरिजसाठी निवड झालेली नाही. अक्षरने न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्टमध्ये चांगली कामगिरी केली होती.

भारताच्या वनडे टीममध्ये दोन युवा खेळाडूंना संधी मिळू शकते, यात ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर यांचा समावेश होऊ शकतो. दोघांनीही नुकत्याच संपलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी केली होती. याशिवाय इशान किशन आणि शिखर धवन यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो. धवन विजय हजारे ट्रॉफीमध्ये अपयशी ठरला होता, पण सीनियर खेळाडू म्हणून त्याला संधी दिली जाऊ शकते.

First published:
top videos

    Tags: Rohit sharma