VIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर

VIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर

भारताचा हिटमॅन रोहित शर्मा पत्रकारांशी बोलत असताना अनेकदा मजेशिर उत्तरं देत असतो. आताही त्याने पत्रकाराच्या एका प्रश्नावर दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • Share this:

भारताचा हिटमॅन रोहित शर्मा पत्रकारांशी बोलत असताना अनेकदा मजेशिर उत्तरं देत असतो. आताही त्याने पत्रकाराच्या एका प्रश्नावर दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

रांची, 22 ऑक्टोबर : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसऱा कसोटी सामना एक डाव 202 धावांनी जिंकला. यासह भारतानं मालिकेत आफ्रिकेला व्हाइट वॉश दिला. भारताने पहिला डाव 497 धावांवर घोषित केला होता. यामध्ये हिटमॅन रोहित शर्माने द्विशतक तर अजिंक्य रहाणेनं शतक केलं. यानंतर भारताच्या गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारतानं पहिला डाव घोषित केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रोहित शर्माने दिलेल्या एका उत्तराची सध्या चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

रोहित शर्मा पत्रकार परिषदेत बोलत असताना त्याला अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवरून प्रश्न विचारण्यात आला. अजिंक्यच्या फलंदाजीबद्दल तु काय सांगशील. ज्यावेळी 300 धावांवर 3 गडी बाद झालेले असतात तेव्हा बाद होतो आणि 40 वर 3 बाद असतात तर साला चाबुक बॅटिंग करतो?

पत्रकाराच्या प्रश्नावर रोहितने हसत उत्तर देत म्हटलं की, अज्जू को साला मत कहो यार, त्यानंतर रोहित शर्माने अजिंक्य रहाणेचं कौतुक केलं. अजिंक्यने आतापर्यंत अनेक जबरदस्त खेळी केल्या आहेत आणि संघाला विजय मिळवून दिले आहेत. कठीण काळात तो किती संयमानं खेळतो हे दाखवून दिलं आहे.

भारताचा पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित कऱण्यात आला. यामध्ये रहाणे आणि रोहित शर्मा यांनी 267 धावांची भागिदारी केली. रोहित शर्माने 212 धावा केल्या तर रहाणेनं 115 धावांची खेळी केली.

VIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 10:45 AM IST

ताज्या बातम्या