भारताला धक्का! सामन्यावेळीच साहा OUT तर पंत IN, क्रिकेटच्या इतिहासातली पहिलीच घटना

भारताला धक्का! सामन्यावेळीच साहा OUT तर पंत IN, क्रिकेटच्या इतिहासातली पहिलीच घटना

भारताचा यष्टीरक्षक ऋद्धीमान साहाला दुखापतीमुळे चालू सामन्यातून बाहेर पडावं लागलं. त्याच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षणासाठी मैदानात उतरला.

  • Share this:

रांची, 21 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीवर मजबूत पकड मिळवली आहे. भारतानं पहिला डाव 497 धावांवर घोषित केला. त्यानंतर आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर संपुष्टात आला. भारताने आफ्रिकेला फॉलोऑन दिला. त्यानंतर फलंदाजीला मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाची अवस्था भारतीय गोलंदाजांनी दयनीय करून टाकली. दरम्यान, भारताला या सामन्यात धक्का बसला आहे. भारताचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहाला सामना अर्ध्यातूनच सोडावा लागला.

आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत परतला असताना 27 व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवेळी साहाला त्रास जाणवू लागला. साहाने अचानक ग्लोव्हज काढले आणि त्याच्याभोवती सहकाऱ्यांनी गराडा घातला. त्यानंतर फिजिओदेखील मैदानात आले आणि चर्चेनंतर साहाने बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.

साहा गेल्यानंतर ऋषभ पंत यष्टीरक्षणासाठी आला. नव्या नियमानुसार यष्टीरक्षकाच्या जागी दुसऱ्या यष्टीरक्षकाला खेळता येतं. याआधी या नियमाचा वापर केला नव्हता. अशा प्रकारे यष्टीरक्षक म्हणून मैदानात उतरणारा ऋषभ पंत पहिलाच खेळाडू ठरला आहे.

भारतासाठी साहाची दुखापत चिंतेची गोष्ट आहे. त्याची यष्टीरक्षणातील कामगिरी जबरदस्त अशी आहे. गेल्या दोन कसोटीमध्ये त्याने यष्टीमागे कमाल केली होती. अशक्य वाटणारे असे झेल अफलातून सूर मारत झेलले होते.

आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात दोन तर दुसऱ्या डावात तीन झेल साहाने यष्ट्यांमागे टिपले आहेत. पहिल्या कसोटीत पहिल्या डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली होती. त्यात त्याने 21 धावा काढल्या होत्या. याशिवाय यष्टीमागे एक झेलही घेतला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या खेळत असेलेल्या यष्टीरक्षकांमध्ये साहा सर्वोत्कृष्ठ ठरला आहे. वेगवान गोलंदाजीवेळी झेल घेण्यात त्यानं आघाडी घेतली आहे. यात त्याची अचुकता 96.9 टक्के इतकी आहे. त्याच्या खालोखाल लंकेच्या निराशेन डिक्वेला 95.5 टक्के आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो 95.2 टक्क्यांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. तर भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत 91.6 टक्क्यांसह नवव्या स्थानावर आहे.

घोड्यावर बसून तरुण आले मतदानाला, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 05:41 PM IST

ताज्या बातम्या