टीम इंडियात चाललंय काय? चौथ्या क्रमांकासाठी पंत-अय्यर यांच्यात गोंधळ

टीम इंडियात चाललंय काय?  चौथ्या क्रमांकासाठी पंत-अय्यर यांच्यात गोंधळ

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी एकाच वेळी दोन फलंदाज मैदानात उतरण्याच्या तयारीत होते.

  • Share this:

बेंगळुरू, 23 सप्टेंबर : भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या टी20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. शिखर धवनशिवाय कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. धवनने सर्वाधिक 36 धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीसुद्धा फक्त 9 धावा काढू शकला. पंतला पुन्हा एकदा धावा करण्यात अपय़श आलं. पंत मैदानात उतरला त्यावेळी मोठा गोंधळ झाला. तेव्हा विराटसह सर्वच खेळाडू संभ्रमात पडले. चौथ्या क्रमांकावर एकाच वेळी दोन फलंदाज मैदानात उतरत होते. दोघांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे अशी परिस्थिती झाली. अखेर पंतला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शिखर धवन बाद झाला. दुसऱ्या बाजूला विराट कोहली होता. तेव्हा चौथ्या नंबरवर खेळण्यासाठी पंत आणि अय्यर दोघेही मैदानात येऊ लागले. याबद्दल विराटने सांगितलं की, रणनितीनुसार अय्यर मैदानात उतरणार होता मात्र पंतला पाठवलं. दोघांमध्ये समन्वय नसल्यानं असं झाल्याची शक्यता विराटनं व्यक्त केली. दोघांसोबत फलंदाजी प्रशिक्षकांनीसुद्धा चर्चा केली होती.

विकेट पडल्यानंतर दोघेही मैदानावर येण्याची तयारी करणं हास्यास्पद होतं. दोघेही मैदानावर आले असते तर पिचवर तीन फलंदाज दिसले असते असंही विराट म्हणाला. रणनितीनुसार दहा षटकात जर तीन गडी बाद झाले तर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर आणि त्यानंतर पंत उतरणार होता. धवन आठव्या षटकात बाद झाला. यावेळी अय्यर मैदानावर उतरणं अपेक्षित होतं. दोन्ही फलंदाजांना हे समजलं नसेल त्या परिस्थितीत कोणाला यायला हवं.

ऋषभ पंत 19 धावा काढून बाद झाला. तर श्रेयस अय्यरला 5 धावाच करता आल्या. भारतीय खेळाडूंनी टी20 मध्ये सुस्त फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला 135 धावांचे आव्हान दिले. हे माफक आव्हान आफ्रिकेने एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केलं. कर्णधार क्विंटन डी कॉकच्या नाबाद 79 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं सोपा विजय मिळवला.

VIDEO: आता पाकिस्तानची खैर नाही; भारत-अमेरिकेची दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाई!

Published by: Suraj Yadav
First published: September 23, 2019, 9:53 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading