जडेजाला अर्धशतकानंतर जल्लोष करण्यापासून थांबवलं, विराटनेही घेतली फिरकी

जडेजाला अर्धशतकानंतर जल्लोष करण्यापासून थांबवलं, विराटनेही घेतली फिरकी

  • Share this:

पुणे, 12 ऑक्टोबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने 600 धावांचा टप्पा पार केला. कर्णधार विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी केलेल्या द्विशतकी भागिदारीच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. विराट कोहलीने नाबाद द्विशतक झळकावलं. त्याला साथ देताना रविंद्र जडेजानं 91 धावांची खेळी केली. जडेजाला शतक करण्याची संधी होती मात्र थोडक्यात चुकली.

जडेजानं सुरुवातीपासून सावध खेळ केला. विराट कोहलीचं द्विशतक पूर्ण झाल्यानंतर त्यानं फटकेबाजी सुरू केली. अॅडन मार्करमच्या एकाच षटकात दोन चौकार लगावले. त्यानंतर दोन चेंडूत 4 धावा घेत कसोटीत12 वं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, अर्धशतक झाल्याचं त्याला समजलंच नाही. पुढच्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर आपलं अर्धशतक झाल्याचं त्याला कळलं. तेव्हा तलवार फिरवल्यासारखी बॅट फिरवून जल्लोष केला. त्यावेळी सहकाऱ्यांनी त्याला थांबवलं. यावर जडेजानं इशारा करतच सांगितलं की, मला अर्धशतक झाल्याचं समजलं नाही. त्यानंतर विराट कोहलीनं सुद्धा जडेजाची फिरकी घेतली.

विराट कोहलीने 200 धावा केल्या तेव्हा जडेजा 66 चेंडूत 29 धावांवर खेळत होता. त्यानंतर पुढच्या 38 चेंडूत 62 धावा फटकावल्या. पहिल्या 30 धावांमध्ये जडेजानं फक्त दोन चौकार मारले होते. जेव्हा जडेजा बाद झाला तेव्हा त्याच्या नावावर 91 धावा झाल्या होत्या. त्यात 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

गेल्या दोन वर्षांपासून जडेजानं फलंदाजीत सुधारणा केली आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा जडेजा धावा करतो. गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध त्यानं कसोटीत पहिलं शतक केलं होतं. याशिवाय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात गेल्या दौऱ्यात 80 पेक्षा जास्त धावांची खेळी केली. जडेजानं आतापर्यंत 12 अर्धशतकं केली असून त्यातील 5 अर्धशतकं परदेशात केली आहेत. 2017 नंतर भारतात फलंदाजीच्या सरासरीत विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्यानंतर जडेजाचं नाव येतं. त्याची फलंदाजीची सरासरी 50 च्या जवळपास आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 3 त्रिशतकं आहेत.

SPECIAL REPORT: तळकोकणातील राजकीय शिमग्यात मुख्यमंत्र्यांची उडी?

Published by: Suraj Yadav
First published: October 12, 2019, 8:44 AM IST
Tags:

ताज्या बातम्या