जडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने अर्धशतकानंतर हवेत बॅट फिरवून जल्लोष केला. त्याचवेळी कर्णधार विराट कोहलीने घोडेस्वारीची नकल केली याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 08:28 AM IST

जडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO

रांची, 22 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेवर विजयासाठी भारताला फक्त दोन गडी बाद करण्याची गरज आहे. भारताने पहिला डाव 497 धावांवर घोषित केल्यानंतर आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर गुंडाळला. त्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेचे 132 धावांत 8 गडी बाद केले. दरम्यान, जडेजानं पहिल्या डावात केलेल्या अर्धशतकाची चर्चा सध्या होत आहे. अर्धशतकानंतर जडेजानं केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जडेजा अर्धशतक किंवा शतकानंतर त्याची बॅट तलवारीसारखी हवेत फिरवून जल्लोष करतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्यानं अशाच प्रकारे जल्लोष केला. त्याचवेळी ड्रेसिंग रूममधून विराटनेही इशारा केला. तलवारबाजीची अॅक्शन करणाऱ्या जडेजाला विराटने घोडेसवारीची नकल करत इशाऱ्यानेच घोडा कुठं आहे असं विचारलं.

Loading...

रांचीतील कसोटीत जडेजाने 119 चेंडूत 51 धावांची खेळी केली. अर्धशतकानंतर जॉर्ज लिंडेच्या गोलंदाजीवर क्लासेनच्या हाती झेल देऊन बाद झाला. या खेळीत त्याने चार चौकार मारले. त्याने रोहित शर्मासोबत 64 धावांची भागिदारी केली. त्यानंतर साहासोबत 47 तर अश्विनसोबत 33 धावांची भागिदारी करून भारताला 497 450 धावांचा टप्पा गाठून दिला.

वाचा : भारताला धक्का! सामन्यावेळी साहा OUT तर पंत IN, क्रिकेटच्या इतिहासातली पहिली घटना

जडेजाने आतापर्यंत कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी केली आहे. अष्टपैलू खेळी करत त्याने 10 विकेट घेताना 212 धावा केल्या आहेत. पुण्यातील कसोटी सामन्यातही त्याने 91 धावा केल्या होत्या. कसोटीत जडेजाने आतापर्यंत 46 कसोटीमध्ये 1 हजार 1772 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतकही आहे. याशिवाय 208 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. यात एका कसोटीमध्ये 9 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत.

VIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 08:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...