मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : 'संधी देतो तर चांगल्या कामगिरीची अपेक्षा', द्रविडचा या दोन भारतीय खेळाडूंना इशारा

IND vs SA : 'संधी देतो तर चांगल्या कामगिरीची अपेक्षा', द्रविडचा या दोन भारतीय खेळाडूंना इशारा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाची (India vs South Africa) कामगिरी निराशाजनक झाली. पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवल्यानंतर भारताने उरलेल्या दोन्ही टेस्ट आणि तिन्ही वनडे मॅच गमावल्या. या पराभवानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) टीम इंडियाच्या खेळाडूंना सज्जड दम भरला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

केपटाऊन, 24 जानेवारी : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाची (India vs South Africa) कामगिरी निराशाजनक झाली. पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवल्यानंतर भारताने उरलेल्या दोन्ही टेस्ट आणि तिन्ही वनडे मॅच गमावल्या. या पराभवानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) टीम इंडियाच्या खेळाडूंना सज्जड दम भरला आहे. खेळाडूंना टीममध्ये स्थिरता आणि सुरक्षा मिळेल, पण त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, असं द्रविड ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) म्हणाला. टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा (Team India) 2-1 ने आणि वनडे सीरिजमध्ये 3-0 ने पराभव झाला.

'आम्ही त्यांना वारंवार संधी दिली आहे, त्यांना टीममधल्या आपल्या स्थानाबाबत सुरक्षित वाटावं, पण सुरक्षा आणि संधी दिल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतो. या स्तरावर खेळणाऱ्या प्रत्येकाकडून अशीच अपेक्षा केली जाते,' असं द्रविड म्हणाला. श्रेयस अय्यरने तीन मॅचच्या सीरिजमध्ये 17,11 आणि 26 रनच केले. वनडे सीरिजच्या तिन्ही सामन्यांमध्ये मधली फळी अपेक्षेनुसार कामगिरी करू शकली नाही. तिसऱ्या सामन्यात पंत खराब शॉट मारून आऊट झाला.

टीममधल्या स्थानासाठी स्पर्धा

'तुम्ही चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर खेळत असाल तर टीमची गरज काय आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. श्रेयस तिन्ही मॅचमध्ये लवकर आऊट झाला. हे सगळे खेळाडू चांगली कामगिरी करतात हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्हीही त्यांना सहकार्य करू, पण टीममध्ये प्रत्येक स्थानासाठी खूप जास्त स्पर्धा आहे,' असा इशाराच द्रविडने दिला. मधल्या ओव्हरमध्ये आम्हाला चांगली बॅटिंग करण्याची गरज होती. 2 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने पहिले बॅटिंग करून 290 रन केले. आपण बघितलं तर दोन्ही मॅचमध्ये 30 ओव्हरनंतर आम्ही आव्हान गाठण्याच्या स्थितीमध्ये होतो, अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली.

राहुल द्रविडने कोणत्याही खेळाडूचं नाव घेतलं नसलं तरी काही जणांनी खराब शॉट मारल्याचं तो म्हणाला. व्यंकटेश अय्यरला स्वत:ला मधल्या फळीत खेळायची सवय करून घ्यावी लागेल. व्यंकटेश अय्यरला सहावा बॉलर म्हणून तयार करायचं आहे. व्यंकटेश असो किंवा हार्दिक, जडेजा. जेव्हा ते पुनरागमन करतील तेव्हा आमच्याकडे बरेच पर्याय उपलब्ध असतील, असं द्रविडने सांगितलं.

First published:

Tags: Rahul dravid, Rishabh pant, Shreyas iyer, Team india