मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : विराटच्या कॅप्टन्सी वादाची आणखी एक बाजू, द्रविड पहिल्यांदाच बोलला

IND vs SA : विराटच्या कॅप्टन्सी वादाची आणखी एक बाजू, द्रविड पहिल्यांदाच बोलला

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India tour of South Africa) आहे. या दौऱ्यात तीन टेस्ट आणि तीन वनडे मॅचची सीरिज होणार आहे. टेस्ट सीरिजला (India vs South Africa) 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.

सेंच्युरियन, 25 डिसेंबर : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India tour of South Africa) आहे. या दौऱ्यात तीन टेस्ट आणि तीन वनडे मॅचची सीरिज होणार आहे. टेस्ट सीरिजला (India vs South Africa) 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. हा दौरा सुरू होण्याआधीच भारतीय क्रिकेटमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं होतं. या वादावर पहिल्यांदाच टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) प्रतिक्रिया दिली आहे.

'दोन फॉरमॅटसाठी दोन कर्णधार ठेवण्याचा निर्णय निवड समितीचा होता. मी खेळाडूंसोबत काय चर्चा केली, त्याबद्दल मी सार्वजनिक बोलणार नाही,' असं राहुल द्रविड म्हणाला. विराट कोहलीऐवजी रोहित शर्माला (Rohit Sharma) वनडे टीमचं कर्णधार बनवण्यात आलं. दुखापतीमुळे रोहित टेस्ट सीरिजमध्ये खेळणार नाही. याशिवाय रोहित टेस्ट टीमचा उपकर्णधारही होता.

विराट कोहलीला टेस्ट क्रिकेटविषयी प्रेम आहे, यावेळच्या लढाईसाठी तो तयार आहे, असं वक्तव्य राहुल द्रविडने केलं. भारताला अजूनपर्यंत एकदाही दक्षिण आफ्रिकेत सीरिज जिंकता आलेली नाही. या सामन्यासाठी प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोण असणार, असा प्रश्न विचारला असता याबाबत टॉसवेळीच सांगितलं जाईल, असं उत्तर द्रविडने दिलं. न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाच्या टेस्टमध्येच श्रेयस अय्यरने शतक आणि अर्धशतक केलं होतं. या कामगिरीनंतर अय्यरने टेस्ट टीममधला आपला दावा मजबूत केला आहे.

प्रत्येक खेळाडू प्रोफेशनल

कधी कधी तुम्हाला कठीण निर्णय घ्यावे लागतात, प्रत्येक खेळाडू प्रोफेशनल आहेत, त्यामुळे ते यासाठी तयार असतात. प्रत्येकाला खेळण्याची इच्छा असते, पण तुम्ही त्यांच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधला तर त्यांना ही गोष्ट समजते. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा खराब फॉर्ममध्ये आहेत. या दोन्ही सीनियर खेळाडूंसाठी ही सीरिज महत्त्वाची आहे.

First published:
top videos

    Tags: Rahul dravid, Team india, Virat kohli