Home /News /sport /

IND vs SA ODI Series: दक्षिण अफ्रिकेच्या संघात या स्फोटक बॅट्समनचं पुनरागमन; हा युवा बॉलरही ठरू शकतो घातक

IND vs SA ODI Series: दक्षिण अफ्रिकेच्या संघात या स्फोटक बॅट्समनचं पुनरागमन; हा युवा बॉलरही ठरू शकतो घातक

दक्षिण अफ्रिकेचा स्फोटक बॅट्समन क्विंटन डिकॉकचं वन डेमध्ये पुनरागमन झालं आहे. टेस्ट सीरिजमध्ये लक्ष वेधणारा मार्को यानसेन वन डेमध्ये पदार्पण करणार आहे.

  पार्ल, 19 जानेवारी – टेस्ट क्रिकेटला (Test cricket) अचानक अलविदा करणारा दक्षिण अफ्रिकेचा (South Africa) बॅट्समन क्विंटन डिकॉक (Quinton de Kock)  हा भारताविरुद्धच्या तीन मॅचच्या वन डे सीरिजमध्ये स्वतःला सिद्ध करणार आहे, असं दक्षिण अफ्रिका क्रिकेट टिमचा लिमिटेड ओव्हर्सचा कॅप्टन तेंबा बावुमा (Temba Bavuma) नं म्हटलं आहे. दोन्ही देशांदरम्यान (India vs South Africa) च्या सीरिजची सुरुवात बुधवारी म्हणजेच 19 जानेवारीला होणार आहे. डावखुरा आक्रमक बॅट्समन आणि विकेटकिपर डिकॉकनं भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या पहिल्या मॅचनंतर निवृत्तीची घोषणा केली होती. तेंबा बावुमा याने ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले, “क्विनी (डिकॉक)ला पुन्हा टिममध्ये पाहणे चांगले ठरेल. टेस्ट टिममध्ये त्याची कमतरता भासणे सहाजिकच आहे. त्याने निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. त्याला स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा असेल”. भारताविरुद्ध वन डे सीरिज खेळण्याबाबत बावुमा म्हणाला, की “आम्ही एका बळकट टिमसोबत खेळणार आहोत. आम्ही आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार आहोत. मर्यादित ओव्हर्सच्या फॉरमॅटमध्ये भारत एक बळकट टिम आहे. इतर टिमप्रमाणेच आम्ही भारतीय टिमचाही सन्मान करतो. टेस्ट सीरिजची कामगिरी पाहता हा सामना कठीण जाईल हे आम्हाला ठाऊक आहे”.

  IND vs SA ODI Series : Virat Kohali पुन्हा बनणार ‘रन मशीन’! कॅप्टन्सी गेल्यानंतर ही असेल महत्त्वाची भूमिका

  तेंबा बावुमा म्हणाला, की “डावखुरा वेगवान बॉलर मार्को जेन्सनचा वन डे टिममध्ये समावेश झाला आहे. प्लेइंग 11 मध्ये तो जागा बनवण्याच्या स्पर्धेत असेल. मार्को याचा वन डे टिममध्ये समावेश केला आहे. त्याच्याकडे क्रिकेटची क्षमता किती आहे, हे जगाने पाहिलं आहे. मर्यादित ओव्हरच्या टिममध्ये आणण्यासाठी जास्त डोकं लावण्याची गरज पडली नाही. प्लेइंग 11 मध्ये जागा मिळवण्यामध्ये तो भक्कम दावेदार आहे. बॉलिंगच्या व्यवस्थापनाबाबत आम्हाला पार्ल इथल्या परिस्थितीतचा विचार करावा लागणार आहे. उंच जागेच्या क्षेत्रातील पिचपेक्षा हे पिच खूप वेगळे असेल. हे पिच थोडं संथ आहे”.

  IND vs SA ODI Series : पहिल्या सामन्यासाठी के एल राहुलने आपल्या बॅटिंग पोझिशनबद्दल केला हा खुलासा, कर्णधारपदाबद्दलही म्हणाला...

  अफ्रिकेचा कॅप्टन बवुमा म्हणाला, “लुंगी एनगिडी, यानसेनसारखे बळकट दावेदार आहेत. कोणते प्लेअर परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात हे आम्हाला पाहावे लागेल. पार्ल इथलं पिच स्पिनर्सना मदत करेल. तबरेज शम्सी, केशव महाराज सर्व बॉलर्सचा दावा बळकट असेल. टिमच्या प्रत्येक खेळाडूचा विचार केला जाईल. भारतीय स्पिनर्सचा सामना करण्यासाठी बॅट्समन गेल्या काही दिवसांपासून तयारी करत आहे”.
  Published by:News18 Web Desk
  First published:

  Tags: Cricket, Cricket news, South africa

  पुढील बातम्या