Home /News /sport /

IND vs SA : पुजारा-रहाणेच्या मागे लपली या खेळाडूची खराब कामगिरी, मागच्या 12 इनिंगमध्ये सुपर फ्लॉप!

IND vs SA : पुजारा-रहाणेच्या मागे लपली या खेळाडूची खराब कामगिरी, मागच्या 12 इनिंगमध्ये सुपर फ्लॉप!

टीम इंडियाची (Team India) गेल्या दोन वर्षांमधली कामगिरी उल्लेखनीय झाली असली तरी मधल्या फळीचा फॉर्म टीमसाठी चिंतेचा विषय आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही (India vs South Africa) चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांना खास कामगिरी करता आली नाही.

पुढे वाचा ...
    जोहान्सबर्ग, 4 जानेवारी : टीम इंडियाची (Team India) गेल्या दोन वर्षांमधली कामगिरी उल्लेखनीय झाली असली तरी मधल्या फळीचा फॉर्म टीमसाठी चिंतेचा विषय आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही (India vs South Africa) चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांना खास कामगिरी करता आली नाही. पुजारा 3 रनवर तर अजिंक्य रहाणे पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. पुजाराचं अखेरचं शतक 2019 साली तर रहाणेचं शेवटचं शतक 2020 डिसेंबरमध्ये आलं आहे. या खराब फॉर्ममुळे दोघांचंही टीम इंडियामधलं स्थानही अडचणीत आलं आहे. भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही पुजारा आणि रहाणेसाठी जोहान्सबर्ग टेस्टमधली दुसरी इनिंग ही शेवटची संधी असू शकते, अशी भविष्यवाणी केली आहे. एकीकडे पुजारा आण रहाणेच्या कामगिरीवर सातत्याने टीका होत असली, तरी टीमचा आणखी एक खेळाडू आहे, ज्याची कामगिरीही निराशाजनकच झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) 17 रनवर आऊट झाला. मार्को जेनसनच्या बॉलिंगवर विकेट कीपर काईल वेरेने याने पंतचा कॅच पकडला. पंतला स्विंग आणि बाऊन्स होणाऱ्या बॉलवर अडचणींचा सामना करावा लागतो, या विकेटवेळीही असंच बघायला मिळालं. मागच्या 12 इनिंगमध्ये 250 रन ऋषभ पंतने त्याचं मागचं शतक 2021 साली इंग्लंडविरुद्ध केलं होतं. अहमदाबाद टेस्टमध्ये पंतने 101 रनची खेळी केली होती. या शतकानंतर पंतने 12 इनिंग खेळल्या, यात त्याने एका अर्धशतकाच्या मदतीने 250 रन केले. या दरम्यान त्याची सरासरीही फक्त 20.83 ची आहे. ऋषभ पंतने 12 इनिंग्समध्ये 4, 41, 25, 37, 22, 2, 1, 9, 50, 8, 34, 17 असे स्कोअर केले आहेत. पंतसाठी 2021 सालची सुरूवात चांगली झाली होती. ऑस्ट्रेलियात सीरिज जिंकवण्यामध्ये पंतची भूमिका मोलाची होती. सिडनी टेस्टच्या अखेरच्या इनिंगमध्ये त्याने 97 रन करून मॅच ड्रॉ केली होती, तर ब्रिस्बेनमध्ये नाबाद 89 रन करून पंतने भारताला विजय मिळवून दिला होता. यानंतर इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजमध्येही पंतने त्याचा फॉर्म कायम ठेवला, पण त्यानंतर पंतचा संघर्ष सुरू झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Pujara, Rishabh pant, South africa, Team india

    पुढील बातम्या