मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : '...तर माझे पैसे कापतील', वादानंतर मयंक अग्रवालचा बोलायला नकार!

IND vs SA : '...तर माझे पैसे कापतील', वादानंतर मयंक अग्रवालचा बोलायला नकार!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs South Africa 1st Test) केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs South Africa 1st Test) केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs South Africa 1st Test) केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली.

सेंच्युरियन, 27 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs South Africa 1st Test) केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर राहुल आणि मयंक ही ओपनिंग जोडी मैदानात उतरली. सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर गवत होतं, तसंच वातावरणही ढगाळ होतं, त्यामुळे अनेकांनी विराटच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राहुल आणि मयंकनी मात्र चांगली सुरुवात करून देऊन भारताला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 117 रनची पार्टनरशीप झाली.

मयंक अग्रवालने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं, पण 41 व्या ओव्हरमध्ये 60 रन करून तो आऊट झाला. लुंगी एनगिडीच्या बॉलिंगवर मयंकला एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आलं. मात्र हा निर्णय वादात सापडला आहे. अनेकांनी एलबीडब्ल्यूच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं, तर स्वत: मयंकही हैराण झाला.

लुंगी एनगिडीच्या (Lungi Ngidi) आत येणारा बॉल मयंकच्या पॅडच्या वरच्या भागाला लागला. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी अपील केलं. मैदानातल्या अंपायरनी नॉट आऊट दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने डीआरएसचा वापर केला. बॉल ट्रॅकिंगमध्ये बॉल स्टम्पच्या वरच्या भागाला लागत असल्याचं दिसलं, त्यामुळे अंपायर कॉल असावा असं अनेकांना वाटलं, पण असं झालं नाही आणि मयंकला आऊट देण्यात आलं.

मयंकला आऊट दिल्यानंतर वसीम जाफरनेही (Wasim Jaffer) नाराजी व्यक्त केली आहे. जाफरने मजेदार मीम शेयर करत मयंक दुर्दैवी असल्याचं सांगितलं.

मॅच संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मयंकला याबाबत विचारलं असता त्याने बोलणं टाळलं. मला या निर्णयावर मत मांडायला परवानगी नाही. त्यामुळे मी हे इकडेच सोडून देतो. यावर मी बोललो तर माझं मानधन कापलं जाईल, असं मयंक म्हणाला. मयंकने या वादावर प्रतिक्रिया दिली नसली तरी त्याने इशाऱ्या इशाऱ्यांमध्ये आपण नाराज असल्याचं सांगितलं.

First published:

Tags: South africa, Team india