मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : 15 व्या वर्षीच वडिलांचं छत्र हरपलं, आता थेट रोहितऐवजीच टीम इंडियात एण्ट्री!

IND vs SA : 15 व्या वर्षीच वडिलांचं छत्र हरपलं, आता थेट रोहितऐवजीच टीम इंडियात एण्ट्री!

Photo-BCCI

Photo-BCCI

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याआधीच टीम इंडियाला (India vs South Africa) मोठा धक्का बसला आहे. टीमचा नवनियुक्त उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma Injured) दुखापतीमुळे संपूर्ण टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला आहे. रोहितऐवजी प्रियांक पांचाळ (Priyank Panchal) याची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 डिसेंबर : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) 16 डिसेंबरला रवाना होणार आहे. या दौऱ्यात 3 टेस्ट आणि 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे. 26 डिसेंबरपासून पहिली टेस्ट खेळवली जाणार आहे, पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीमचा नवनियुक्त उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma Injured) दुखापतीमुळे संपूर्ण टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला आहे. रोहितची दुखापत गंभीर असल्यामुळे तो वनडे सीरिजसाठीही फिट होणं कठीण वाटत आहे. टेस्ट टीमचा उपकर्णधार होण्यासोबतच रोहितची वनडे टीमचा कर्णधार म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रियांक पांचाळला संधी

रोहित शर्माला मुंबईमध्ये नेट प्रॅक्टिस करताना मांडीच्या मांसपेशींना दुखापत झाली, त्यामुळे रोहितऐवजी प्रियांक पांचाळ याची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. प्रियांक पांचाळ हा भारतीय ए टीमचा कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध त्याने नुकतीच 96 रनची खेळी केली होती.

अहमदाबादचा असलेला प्रियांक पांचाळ (Priyank Panchal) गुजरातमधून स्थानिक क्रिकेट खेळतो. 31 वर्षांचा प्रियांक नुकताच दक्षिण आफ्रिका दौऱ्याहून परतला आहे. भारत ए आणि दक्षिण आफ्रिका ए यांच्यात झालेल्या सीरिजमध्ये प्रियांकने टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं.

प्रियांक फक्त 15 वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं प्रियांकने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. मुलाने क्रिकेट खेळावं, हे स्वप्न त्याच्या वडिलांनी पाहिलं होतं. आता प्रियांक आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

इंडिया ए च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात निवड समितीने प्रियांक पांचाळला पृथ्वी शॉऐवजी संधी दिली होती. 31 वर्षांचा प्रियांक अनुभवी खेळाडू आहे. त्याने 98 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 45.63 च्या सरासरीने 6,891 रन केले, यात 24 शतकं आहेत, याशिवाय त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 40.19 च्या सरासरीने 2,854 रन केले.

First published: