कॉट अॅण्ड बोल्डचा अनोखा प्रकार, हेल्मेटनेच घेतली विकेट; पाहा VIDEO

कॉट अॅण्ड बोल्डचा अनोखा प्रकार, हेल्मेटनेच घेतली विकेट; पाहा VIDEO

नॉन स्ट्रायकरला असलेल्या सहकारी फलंदाजामुळे आफ्रिकेचा एनगीडी झेलबाद झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

रांची, 22 ऑक्टोबर : भारताने आफ्रिकेला तिसऱ्या कसोटीत एक डाव 202 धावांनी पराभूत केलं. यासह मालिकेत 3-0 ने विजय मिळवला. चौथ्या दिवशी भारताने फक्त 12 चेंडूतच उरलेल्या दोन फलंदाजांना बाद केलं. या सामन्यातील शेवटची विकेट वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. शाहबाज नदीमच्या गोलंदाजीवर एनगीडी नदीम झेलबाद झाला.

नदीमच्या गोलंदाजीवर एनगीडीने फटकावलेला चेंडू नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेल्या फलंदाजाच्या हेल्मेटवर आदळला. त्यानंतर नदीमने चेंडू झेलला आणि एनगीडी बाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या 48 व्या षटकातील शेवटचा चेंडू नदीमने टाकला. त्यानंतर एनगीडीने स्ट्रेट शॉट मारला. पण चेंडू नॉन स्ट्रायकरला असलेल्या सहकारी फलंदाजच्या हेल्मेटवर आदळून नदीमच्या हाती गेला. यावेळी आफ्रिकेच्या दोन्ही फलंदाजांनाही हसू आवरता आले नाही.

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना एक डाव आणि 202 धावांनी जिंकला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्या माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फंलदाजांची दाणादाण उडाली. तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेचे 8 ग़डी बाद झाले होते. त्यानंतर चौथ्या दिवशी भारताने फक्त 12 चेंडूत उरलेले दोन गडी बाद करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारतानं याआधीचे दोन्ही कसोटी सामने जिंकले होते. तिसरा सामना जिंकून आफ्रिकेला व्हाइट वॉश दिला.

तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात 497 धावा केल्यानंतर आफ्रिकेला फॉलोऑन दिला. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेची अवस्था तिसऱ्या दिवसअखेर 8 बाद 132 अशी झाली होती. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवशी शमीने 10 धावात 3 तर उमेश यादवने 2 गडी बाद केले. त्यांची अवस्था 5 बाद 36 अशी झाली होती. त्यानंतर जॉर्ज लिंडे (27 धावा), डेन पीट (23 धावा) यांनी डाव सावरला. त्यानंतर थिनिस डी ब्रुइन नाबाद 30 धावा केल्या. त्याच्यासोबत एनरिच नॉर्तझे 5 धावांवर खेळत होते. चौथ्या दिवशी भारताने त्यांचा डाव 133 धावांवर संपुष्टात आणला.

VIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 12:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading