भारतीय गोलंदाजांचं 259 चेंडूत 'वस्त्रहरण', 18 वर्षांनी लाजिरवाणा विक्रम

भारतीय गोलंदाजांचं 259 चेंडूत 'वस्त्रहरण', 18 वर्षांनी लाजिरवाणा विक्रम

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीवर मजबतू पकड मिळवली आहे.

  • Share this:

पुणे, 13 ऑक्टोबर : भारताने दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीवर मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या सत्रात आफ्रिकेचे दोन गडी बाद केले असून विजय मिळवण्यासाठी भारताला 8 गडी बाद करण्याची गरज आहे. भारताने पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीच्या द्विशतकाच्या जोरावर 601 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गुंडाळून त्यांना फॉलोऑन दिला. पहिल्या डावात खेळताना आफ्रिकेच्या आघाडीच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांना लवकर बाद केलं पण तळातील फलंदाजांनी दमछाक केली.

पहिल्या डावात आफ्रिकेचे 162 धावांवर 8 गडी बाद झाले होते. त्यानंतर केशव महाराज आणि वेरनन फिलेंडर यांनी भारताच्या गोलंदाजांचा सावध सामना केला. त्यांनी मैदानावर टिकून राहत शतकी भागिदारी केली. यासाठी त्यांनी तब्बल 259 चेंडूंचा सामना केला. यात त्यांनी 9 व्या गड्यासाठी 109 धावांची भागिदारी केली. आफ्रिकेचा डाव 8 बाद 162 वरून सर्वबाद 275 धावांवर संपुष्टात आला. यामध्ये केशव महाराज आणि फिलेंडरनं केलेली भागिदारी महत्त्वाची ठरली.

गेल्या तीन वर्षांत भारताच्या गोलंदाजांना पहिल्या डावात 9 ते 11 क्रमांकाच्या फलंदाजांना बाद करण्याची डोकेदुखी आहे. 2015 ते 2018 च्या दरम्यान भारतीय गोलंदाजांना 9 ते 11 व्या क्रमांकावरील फलंदाजांना बाद करण्यासाठी 26.5 बॉल प्रतिविकेट लागले. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी हीच सरासरी 48.3 बॉल इतकी झाली होती.

दरम्यान, पहिल्या कसोटीत पिट आणि मुथ्थुसामीने 194 चेंडू तर दुसऱ्या कसोटीत महाराज आणि फिलेंडर यांनी 259 चेंडू खेळत भारतीय गोलंदाजांना विकेट मिळू दिली नाही. यामुळे 48.3 बॉल प्रतिविकेटवरून 62.4 बॉल प्रतिविकेट पर्यंत पोहचला आहे. कसोटीच्या इतिहासात एका सामन्यात 9 ते 10 व्या विकेटसाठी भारतात सर्वाधिक चेंडूचा सामना करणाऱ्या जोडीमध्ये महारज आणि फिलेंडर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 259 चेंडूंचा सामना करत 109 धावांची भागिदारी केली. याआधी 2000-01 मध्ये स्टीव्ह वॉ आणि जेसन गिलेस्पी यांनी कोलकात्यात 268 चेंडू खेळून काढत 133 धावांची भागिदारी केली होती.

वाचा : विराटचा ऐतिहासिक दणका, आफ्रिकेवर पहिल्यांदाच ओढवली 'ही' नामुष्की

पाहा : आऊट झाला की नाही? अश्विनच्या मिस्ट्री बॉलनं सगळेच चक्रावले, VIDEO VIRAL

मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांसोबत मॉर्निंग वॉक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 11:16 AM IST

ताज्या बातम्या