Home /News /sport /

IND vs SA : 'टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये फूट, राहुल-विराट...' क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

IND vs SA : 'टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये फूट, राहुल-विराट...' क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये टीम इंडियाची (India tour of South Africa) कामगिरी निराशाजनक झाली आहे. टेस्ट सीरिज 2-1 ने गमावल्यानंतर पहिल्या वनडेमध्येही टीम इंडियाचा पराभव झाला. दक्षिण आफ्रिका दौरा सुरू व्हायच्या आधीच कॅप्टन्सीचा वाद सुरू झाला.

पुढे वाचा ...
    पार्ल, 20 जानेवारी : दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये टीम इंडियाची (India tour of South Africa) कामगिरी निराशाजनक झाली आहे. टेस्ट सीरिज 2-1 ने गमावल्यानंतर पहिल्या वनडेमध्येही टीम इंडियाचा पराभव झाला. दक्षिण आफ्रिका दौरा सुरू व्हायच्या आधीच कॅप्टन्सीचा वाद सुरू झाला. विराटने (Virat Kohli) टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर त्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं. टेस्ट सीरिज संपल्यानंतर विराटने टेस्ट टीमच्या कॅप्टन्सीचाही राजीनामा दिला. यानंतर पहिल्या वनडेमध्ये विराट खेळाडू म्हणून मैदानात उतरला. या सामन्यात त्याने 51 रनची खेळी केली. विराटच्या कॅप्टन्सीचा वाद ताजा असतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमबाबत खळबळजनक दावे केले आहेत. पहिल्या वनडेवेळी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये फूट दिसली. विराट कोहली आणि केएल राहुल (KL Rahul) वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते, असं दानिश कनेरिया म्हणाला. पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा 31 रनने पराभव केला. पहिल्यांदा बॅटिंग करत आफ्रिकेने 296 रन केले. टेम्बा बऊमा आणि रस्सी व्हॅन डर डुसेन यांनी शतकं केली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 50 ओव्हरमध्ये 265/8 पर्यंतच मजल मारता आली. शिखर धवन, विराट कोहली आणि शार्दुल ठाकूर यांनी अर्धशतकं केली. आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना दानिश कनेरियाने विराट कोहलीच्या मूडवर भाष्य केलं. 'पहिल्या वनडेवेळी भारतीय टीम दोन समुहांमध्ये दिसली. केएल राहुल आणि विराट कोहली वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते. विराट कॅप्टन असताना ज्या मूडमध्ये असायचा तसा दिसला नाही. पण तो टीमसाठी खेळणारा माणूस आहे, लवकरच तो आणखी मजबूत पद्धतीने पुनरागमन करेल,' असं वक्तव्य कनेरियाने केलं. कनेरियाने केएल राहुलच्या कॅप्टन्सीवरही टीका केली. 'टेस्ट सीरिज गमावल्यानंतर भारतीय टीम बदला घ्यायच्या भावनेने मैदानात उतरेल, असं वाटलं होतं. पण केएल राहुलमध्ये तो स्पार्क दिसला नाही. टेस्ट सीरिजमध्येही तो एका सामन्यात कर्णधार होता, पण तेव्हाही त्याला दक्षिण आफ्रिकेची पार्टनरशीप तोडण्यासाठी बॉलरचा आत्मविश्वास वाढवता आला नाही. एकावेळी आफ्रिका 296 रनपर्यंत मजल मारेल, असं वाटलं नव्हतं, पण भारतीय टीममध्ये उर्जेची कमी दिसली,' अशी प्रतिक्रिया कनेरियाने दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Kl rahul, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या