मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : भारताचं स्वप्न मोडणाऱ्यावर रवी शास्त्री फिदा, पीटरसनला पाहून आठवला दिग्गज भारतीय

IND vs SA : भारताचं स्वप्न मोडणाऱ्यावर रवी शास्त्री फिदा, पीटरसनला पाहून आठवला दिग्गज भारतीय

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) पहिलीच टेस्ट सीरिज जिंकून इतिहास घडवण्याचं स्वप्न भंगलं. तिसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव केला. कीगन पीटरसनने (Keegan Petersen) भारताच्या स्वप्नांचा चुराडा केला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 15 जानेवारी : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) पहिलीच टेस्ट सीरिज जिंकून इतिहास घडवण्याचं स्वप्न भंगलं. तिसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव केला. कीगन पीटरसनने (Keegan Petersen) भारताच्या स्वप्नांचा चुराडा केला. तिसऱ्या मॅचमध्ये त्याला प्लेयर ऑफ द मॅच तंच प्लेयर ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. तिसऱ्या टेस्टमध्ये त्याने 2 अर्धशतकं केली. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 72 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 82 रन केले.

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) हेदेखील पीटरसनच्या बॅटिंगवर फिदा झाले आहेत. पीटरसनला पाहून आपल्याला गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण येते, असं रवी शास्त्री म्हणाले आहेत.

'पीटरसन एक दिवस जगातला महान खेळाडू होईल. पीटरसनला पाहून मला माझे लहानपणीचे हिरो गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण होते,' असं ट्वीट रवी शास्त्री यांनी केलं.

तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडिया 13 रनने आघाडीवर होती, पण दक्षिण आफ्रिकेने शानदार पुनरागमन केलं आणि चार दिवसांमध्येच विजय मिळवला. याचसोबत टेस्ट सीरिजही 2-1 ने आपल्या नावावर केली. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत 30 वर्षांमध्ये एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. भारताने निर्णायक टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 223 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 198 रन केले. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या इनिंगमध्ये 210 रन केले होते.

First published:

Tags: Ravi shastri, South africa, Team india