Home /News /sport /

IND vs SA: चेतेश्वर पुजाराने Virat Kohli च्या फिटनेसबाबत दिली मोठी अपडेट

IND vs SA: चेतेश्वर पुजाराने Virat Kohli च्या फिटनेसबाबत दिली मोठी अपडेट

Virat Kohli

Virat Kohli

दुखापतीमुळे बाहेर असणारा विराट कोहली(Virat Kohli) तिसऱ्या कसोटीत तरी खेळणार का असे सवाल उपस्थीत होत आहेत. अशातच चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar pujara) विराट कोहलीच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे.

    जोहान्सबर्ग, 6 जानेवारी: जोहान्सबर्गच्या (Johannesburg) मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (Sa vs Ind 2nd test) यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 1-0 ने पुढे आहे. दरम्यान, क्रिकेट जगतात तिसऱ्या कसोटीची चर्चा जोरदार सुरु आहे. दुखापतीमुळे बाहेर असणारा विराट कोहली(Virat Kohli) तिसऱ्या कसोटीत तरी खेळणार का असे सवाल उपस्थीत होत आहेत. अशातच चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar pujara) विराट कोहलीच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे. तिसऱ्या दिवशीची खेळ संपल्यानंतर पुजाराने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने विराटच्या फिटनेवर भाष्य केले. तो म्हणाला, विराट कोहली 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पूर्णपणे फिट होईल. पाठीच्या दुखण्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकलेला कर्णधार विराट कोहली पूर्वीपेक्षा बरा आहे आणि लवकरच तो पूर्ण तंदुरुस्त होईल. आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसेल. असा अंदाच पुजाराने यावेळी व्यक्त केला. विराट कोहली पाठीच्या दुखण्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला होता. त्याच्याऐवजी केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 113 धावांनी जिंकला होता. दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून जोहान्सबर्गमध्ये खेळवली जाणार होती, पण त्यापूर्वी कोहलीने पाठीच्या वरच्या भागात दुखत असल्याची तक्रार केली होती. यामुळे त्याला या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. कोहलीला स्लिप डिस्कची समस्या तर नाही ना, अशी भीती चाहत्यांमध्ये व्यक्त होत आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Pujara, South africa, Virat kohli

    पुढील बातम्या