मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : तीन वर्षांपूर्वी विराटला दिली नेट प्रॅक्टिस, आता पदार्पणात घेतली त्याचीच विकेट!

IND vs SA : तीन वर्षांपूर्वी विराटला दिली नेट प्रॅक्टिस, आता पदार्पणात घेतली त्याचीच विकेट!

विराट कोहली (Virat Kohli) लागोपाठ दुसऱ्या वर्षी अपयशी ठरला आहे. 2021 च्या अखेरच्या इनिंगमध्येही (India vs South Africa 1st Test) विराटला शतक करता आलेलं नाही. 2020 मध्येही विराट शतक करू शकला नव्हता.

  • Published by:  Shreyas

सेंच्युरियन, 29 डिसेंबर : विराट कोहली (Virat Kohli) लागोपाठ दुसऱ्या वर्षी अपयशी ठरला आहे. 2021 च्या अखेरच्या इनिंगमध्येही (India vs South Africa 1st Test) विराटला शतक करता आलेलं नाही. 2020 मध्येही विराट शतक करू शकला नव्हता. विराटचं मागचं शतक नोव्हेंबर 2019 साली बांगलादेशविरुद्ध कोलकात्यामध्ये झालेल्या डे नाईट टेस्टवेळी झालं होतं, याला आता 25 महिने झाले. यानंतर तिन्ही फॉरमॅटमध्ये विराटची बॅट शांत राहिली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या चौथ्या दिवशी 21 वर्षांच्या मार्को जेनसनने (Marco Jansen) विराटला आऊट केलं. लंचनंतरच्या पहिल्याच बॉलला विराट पॅव्हेलियनमध्ये परतला.

विराट कोहली जेनसनने टाकलेल्या ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या बॉलवर ड्राईव्ह मारायला गेला, पण त्याच्या बॅटच्या एजला बॉल लागला आणि विकेट कीपर क्विंटन डिकॉकने कॅच पकडला. 32 बॉलमध्ये 18 रन करून विराट आऊट झाला. या 18 पैकी 16 रन विराटने बाऊंड्रीच्या मदतीने केले होते, पण पुन्हा एकदा तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.

विराटला आधीही दिला त्रास

याआधी 2018 साली झालेल्या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मार्कोने विराट कोहलीला नेटमध्ये बराच त्रास दिला होता. 2018 च्या सुरुवातीला विराट जोहान्सबर्ग टेस्टच्या आधी वॉंडरर्स स्टेडियमच्या नेटमध्ये बॅटिंग प्रॅक्टिस करत होता. सीरिजच्या एका इनिंगमध्ये त्याने 153 रनची खेळी केली होती, पण सरावामध्ये विराट तीन वेळा ऑफसाईडला बीट झाला. विराटला चकवा देणारा हा फास्ट बॉलर भारतीय नव्हता. 17 वर्षांच्या त्या बॉलरचं नाव होतं मार्को जेनसन.

राहुल द्रविडही झाला प्रभावित

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही मार्कोची बॉलिंग पाहून प्रभावित झाला होता. 2017 साली इंडिया ए च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर या दोन्ही भावांनी मनिष पांडे, करुण नायर आणि अभिनव मुकुंद, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना बॉलिंग केली होती. जेनसन बंधूंची जोडी जेव्हा भारतीय बॅट्समनना बॉलिंग करत होती, तेव्हा राहुल द्रविड (Rahul Dravid) उभा राहून या दोघांची बॉलिंग बघत होता. त्यावेळी द्रविड इंडिया ए चा प्रशिक्षक होता.

First published:

Tags: South africa, Team india, Virat kohli