मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : श्रेयस अय्यर, हनुमा विहारी का दोघं? अशी असणार भारताची Playing XI!

IND vs SA : श्रेयस अय्यर, हनुमा विहारी का दोघं? अशी असणार भारताची Playing XI!

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे टेस्टला सुरुवात होणार आहे. या सामन्याआधी बऱ्याच खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे टीम मॅनेजमेंटसमोर सर्वोत्तम प्लेयिंग इलेव्हन (India Playing XI) निवडण्याचं आव्हान असेल.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 20 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे टेस्टला सुरुवात होणार आहे. या सामन्याआधी बऱ्याच खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे टीम मॅनेजमेंटसमोर सर्वोत्तम प्लेयिंग इलेव्हन (India Playing XI) निवडण्याचं आव्हान असेल, यामध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) यांच्यापैकी एकाची निवड करताना विराट आणि द्रविडसमोर सगळ्यात मोठी डोकेदुखी असेल. रवींद्र जडेजा बाहेर आहे, त्यामुळे पाच बॉलरचं संतुलन राखायचं असेल, तर टीम कठोर निर्णय घेऊ शकते, ज्यामुळे अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) बाहेर बसावं लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) खालच्या क्रमांकावर बॅटिंगमध्ये दिलेल्या योगदानामुळे त्यालाही खेळवलं जाऊ शकतं.

श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध आपल्या टेस्ट पदार्पणातच शतक आणि अर्धशतक केलं होतं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याला पहिल्या टेस्टमध्ये संधी मिळू शकते. भारतीय टीम जेव्हा न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट सीरिज खेळत होती तेव्हा हनुमा विहारी इंडिया ए कडून दक्षिण आफ्रिकेतच खेळत होता. या सीरिजमध्ये विहारीने उल्लेखनीय कामगिरी केली. विहारीने त्याच्या 12 पैकी 11 टेस्ट परदेशात खेळल्या आहेत.

टेस्ट क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 32.84 ची आहे. भारताबाहेर विहारी ज्या टेस्ट खेळल्या त्या टेस्टमध्ये त्याची सरासरी 34.11 ची आहे. ही सरासरी चेतेश्वर पुजारा (34.00) आणि विराट कोहली (32.11) यांच्यापेक्षा जास्त आहे.

रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे तो टेस्ट सीरिजमधून बाहेर आहे, त्याच्याऐवजी केएल राहुल आणि मयंक अग्रवाल हे दोघं ओपनिंगला खेळतील. मयंकने न्यूझीलंडविरुद्ध मुंबई टेस्टमध्ये 150 रनची खेळी केली होती.

भारताची संभाव्य टीम

केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे/श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, आर.अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

First published: