Home /News /sport /

IND vs SA : पहिल्याच सीरिजनंतर राहुलच्या कॅप्टन्सीचा The End, BCCI चा Inside Report!

IND vs SA : पहिल्याच सीरिजनंतर राहुलच्या कॅप्टन्सीचा The End, BCCI चा Inside Report!

रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापत झाल्यामुळे केएल राहुलला (KL Rahul) दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे सीरिजसाठी (IND vs SA ODI Series) टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं, पण पहिल्याच परिक्षेत केएल राहुल नापास झाला.

    मुंबई, 24 जानेवारी : रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापत झाल्यामुळे केएल राहुलला (KL Rahul) दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे सीरिजसाठी (IND vs SA ODI Series) टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं, पण पहिल्याच परिक्षेत केएल राहुल नापास झाला. या सीरिजआधी भारतीय टीम विजयाची दावेदार मानली जात होती, पण केएल राहुलच्या नेतृत्वात भारताला एकही सामना जिंकता आला नाही. वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा 3-0 ने पराभव झाला. त्याआधी टेस्ट सीरिजमध्येही विराट कोहलीला दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या टेस्टमध्ये राहुलला टीमची कॅप्टन्सी देण्यात आली होती. हा सामनाही टीमला गमवावा लागला. वनडे सीरिजदरम्यान केएल राहुलच्या कॅप्टन्सीबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पहिल्या वनडेमध्ये राहुलने व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) सहावा बॉलर म्हणून वापरलं नाही. या सामन्यात जेव्हा अश्विन आणि युझवेंद्र चहल रन देत होते आणि विकेट घेण्यातही अपयशी ठरत होते, तरीही राहुलने व्यंकटेश अय्यरच्या हातात बॉल दिला नाही. केएल राहुलच्या या निर्णयावर सुनिल गावसकर यांनीही प्रश्न उपस्थित केले. आता बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्यानेही राहुलच्या कॅप्टन्सीवर नाराजी व्यक्त केली आहे. रोहित शर्माच्या फिटनेसमुळे राहुलला टेस्ट टीमचा कर्णधार बनवण्यात येईल का? असा प्रश्न पीटीआयने बीसीसीआयच्या अधिकाऱ्याला विचारला. यावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने उलट प्रश्न विचारला. तुम्हाला कोणत्याही दृष्टीने केएल राहुल कर्णधार वाटत होता का? असं बीसीसीआय अधिकारी म्हणाला. बीसीसीआयकडून आलेल्या या वक्तव्यामुळे केएल राहुलच्या अडचणी मात्र वाढू शकतात. राहुलच्या कॅप्टन्सीचा द एण्ड? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये राहुलने ज्यापद्धतीने कॅप्टन्सी केली ते पाहता त्याच्या भविष्यातल्या कॅप्टन्सी करियरला धक्का लागू शकतो. संपूर्ण सीरिजमध्ये राहुलच्या नेतृत्वात धार दिसली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला रोखण्यासाठी त्याच्याकडे कोणतीही रणनिती दिसली नाही. तिन्ही सामन्यात राहुलची कॅप्टन्सी आक्रमक नाही तर रक्षात्मक राहिली. आयपीएलची नवीन टीम लखनऊने केएल राहुलला कॅप्टन केलं. याआधी राहुल पंजाब किंग्सचाही कर्णधार होता, पण त्या टीमची कामगिरीही निराशाजनक झाली. राहुलच्या कॅप्टन्सीचं हे रेकॉर्ड बघता त्याला पुन्हा टीम इंडियाचं नेतृत्व मिळणं सध्या तरी कठीण दिसत आहे. सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही केएल राहुलच्या कॅप्टन्सीवर टीका केली होती. 'विरोधी टीमची जेव्हा पार्टनरशीप झाली तेव्हा ती तोडण्यासाठी राहुलकडे काहीच रणनिती नव्हती. कुठे जायचं हे त्याला समजत नव्हतं. जेव्हा तुमच्याकडे बुमराह आणि भुवनेश्वर कुमार हे दोन डेथ ओव्हरचे सगळ्यात अनुभवी बॉलर आहेत, तेव्हा तुम्हाला त्यांच्या अखेरच्या 5-6 ओव्हर वाचवून ठेवणं गरजेचं असतं. यामुळे तुम्ही विरोधी टीमला मोठा स्कोअर करण्यापासून रोखू शकता,' असं गावसकर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले. गावसकरांचं बीसीसीआयवरही प्रश्नचिन्ह गावसकरांनी केएल राहुलला कॅप्टन्सी देण्यावरून बीसीसीआयवरही प्रश्न उपस्थित केले, कारण 29 वर्षांच्या या खेळाडूने आजपर्यंत आपल्या स्थानिक टीमचं नेतृत्वही केलेलं नाही. 'राहुलजवळ कॅप्टन्सीचा फार अनुभव नाही. मागच्या दोन वर्षांमध्ये त्याने पंजाब किंग्सचं नेतृत्व केलं. याशिवाय रणजी ट्रॉफी किंवा लिस्ट ए मध्येही त्याला कर्णधारपदाचा अनुभव नाही,' असं वक्तव्य गावसकरांनी केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Kl rahul, South africa, Team india

    पुढील बातम्या