राजकोट, 18 जून : चौथ्या T20 मध्ये टीम इंडियाच्या विजयात वेगवान गोलंदाज आवेश खानने (Avesh Khan) महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 18 धावांत 4 बळी घेतले. त्याची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी त्याला 5 सामन्यात फक्त 2 विकेट घेता आल्या होत्या. 23 धावांत 2 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. मालिकेतील पहिल्या 3 सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे ही कामगिरी त्याच्यासाठी खास होती. या सामन्यात प्रथम खेळताना टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 169 धावा केल्या. सामनावीर दिनेश कार्तिकने 27 चेंडूत 55 धावा केल्या. त्याचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक आहे. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 16.5 षटकांत ८७ धावाच करू शकला. भारताने 82 धावांनी मोठा विजय मिळवला.
सामन्यानंतर आवेश म्हणाला की, मी माझ्या कामगिरीवर खूश आहे. विशेष म्हणजे आज पप्पांचा वाढदिवस आहे. मला माझ्या या विकेट त्यांना समर्पित करायच्या आहेत. तो म्हणाला की, खेळपट्टीवर चेंडू दोन प्रकारे उसळी घेत होते. त्यामुळे आम्हाला विकेट-टू-विकेट गोलंदाजी करायची होती. त्यात आम्ही यशस्वी झालो. आतापर्यंत आम्ही क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्ही हा फॉर्म कायम ठेवू इच्छितो.
हे वाचा -
विराट-बाबर आता एकाच टीमकडून खेळणार! प्रत्येक वर्षी होणार सीरिज
पुढच्या मॅचमध्येही अशीच कामगिरी करू -
टीम इंडियाने पहिल्या 4 सामन्यांमध्ये त्याच प्लेइंग-11ला संधी दिली आहे. प्रशिक्षक राहुल द्रविडने आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. मालिकेतील अंतिम सामना 19 जून रोजी बंगळुरू येथे होणार आहे. याबाबत आवेश खान म्हणाला की, पुढच्या सामन्यातही आम्ही आमचे 100 टक्के योगदान देऊ आणि मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहोत. या मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याची माहिती आहे. नंतर केएल राहुल आणि डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव दुखापतींमुळे मालिकेतून बाहेर पडला.
हे वाचा -
भारताच्या माजी क्रिकेटपटूंना किती पेन्शन मिळते? असे आहेत BCCI चे स्लॅब
विजयानंतर कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याने शानदार फलंदाजी केली. यामुळे आम्ही चांगला खेळ करू शकलो. यानंतर गोलंदाजांनी आपले काम चोख पूर्ण केले. तो म्हणाला की मला माझ्या कामगिरीची चिंता नाही. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांमध्ये पंतला मोठी खेळी करता आलेली नाही. त्याच्या कामगिरीवर अनेक दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.