मुंबई, 21 डिसेंबर : भारताविरुद्ध 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 3 टेस्ट मॅचच्या सीरिजआधीच दक्षिण आफ्रिकेला (India vs South Africa) मोठा धक्का लागला आहे. टीमचा फास्ट बॉलर एनरिच नॉर्किया (Anrich Nortje) दुखापतीमुळे टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला आहे. नॉर्कियाच्या दुखापतीबाबत दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने कोणतीही माहिती दिलेली नाही, पण त्याची दुखापत कायम असल्याचं बोर्डाने सांगितलं आहे. तसंच नॉर्कियाचा बदली खेळाडू म्हणूनही कोणाचीच निवड करण्यात आलेली नाही.
'दुर्दैवाने नॉर्किया टेस्ट मॅचमध्ये बॉलिंग करण्यासाठी पूर्णपणे फिट झालेला नाही, सध्या तो तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आहे, ज्यामुळे तो लवकर फिट होईल,' असं क्रिकेट साऊथ आफ्रिकाने सांगितलं आहे.
#Proteas Squad update 🚨 Anrich Nortje has been ruled out of the 3-match #BetwayTestSeries due to a persistent injury 🚑 No replacement will be brought in#SAvIND #FreedomSeries #BePartOfIt pic.twitter.com/5R8gnwdcpF
— Cricket South Africa (@OfficialCSA) December 21, 2021
नॉर्कियाच्या गैरहजेरीत दक्षिण आफ्रिकेची बॉलिंग कमजोर होणार आहे, पण टीममध्ये कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी आहेत. नॉर्किया आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. नॉर्कियाने त्याच्या वेगाने अनेकांना प्रभावित केलं होतं, याच कारणामुळे दिल्लीने आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शन आधी नॉर्कियाला रिटेन केलं.
भारतीय खेळाडूंचा दक्षिण आफ्रिकेत फास्ट बॉलरसमोर खेळण्याचा अनुभव फारसा चांगला नाही, त्यामुळे नॉर्कियाचं बाहेर होणं भारतीय टीमसाठी दिलासादायक असेल नॉर्कियाने यावर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये उत्कृष्ट बॉलिंग केली आहे. 5 मॅचमध्ये 20.76 च्या सरासरीने त्याने 25 विकेट घेतल्या. यावर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने प्रत्येक 37व्या बॉलवर विकेट मिळवली. नॉर्कियाने यावर्षी दोनवेळा 5 विकेटही घेतल्या. 6/56 त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 2021 मध्ये नॉर्किया दक्षिण आफ्रिकेचा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South africa, Team india