Home /News /sport /

IND vs SA : चित्त्यापेक्षाही चपळ पीटरसन, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल भन्नाट!

IND vs SA : चित्त्यापेक्षाही चपळ पीटरसन, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल भन्नाट!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडिया (India vs South Africa 3rd Test) अडचणीत सापडली आहे. तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच भारताने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) विकेट गमावली.

पुढे वाचा ...
    केपटाऊन, 13 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडिया (India vs South Africa 3rd Test) अडचणीत सापडली आहे. तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच भारताने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) विकेट गमावली. चेतेश्वर पुजारा दिवसाच्या दुसऱ्याच बॉलला आऊट झाला. 9 रन करून पुजारा माघारी परतला. तर अजिंक्य रहाणे फक्त एक रनवर आऊट झाला. दिवसाची सुरूवात भारताने 57/2 अशी केली होती, पण काही वेळातच भारताचा स्कोअर 58/4 असा झाला. तिसऱ्या दिवसाची सुरूवात मार्को जेनसनने केली, यानंतर दुसऱ्याच बॉलला त्याने पुजाराला आऊट केलं. दक्षिण आफ्रिकेचा कीगन पीटरसन (Keegab Petersen Catch) याने पुजाराचा भन्नाट कॅच पकडला. जेनसनने लेग स्टम्पच्या दिशेने टाकलेला बॉल पुजाराने फाईन लेगच्या दिशेने मारला, पण लेग स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पीटरसनने उडी मारून एका हातात कॅच पकडला. पीटरसनने पकडलेल्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुजाराच्या नावावर लाजिरवाणं रेकॉर्ड दिवसाच्या दुसऱ्याच बॉलला आऊट झाल्यानंतर पुजाराच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. दिवसाच्या सुरूवातीला एकही रन न करता सर्वाधिक वेळा आऊट होण्याचा रेकॉर्ड पुजाराच्या नावावर झाला आहे. पुजारा दिवसाच्या सुरूवातीलाच एकही रन न करता 7 वेळा आऊट झाला आहे. जॅक कॅलीस आणि क्रिस केर्न्स 6 वेळा, ग्रॅम गुच, मायकल अथर्टन, पॉवेल, द्रविड आणि मिसबाह उल हक 5 वेळा अशाप्रकारे आऊट झाले आहेत. अजिंक्य रहाणे पुन्हा फेल दुसरीकडे अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. फक्त एक रन करून रहाणे माघारी परतला. मागच्या 50 टेस्टच्या 85 इनिंगमध्ये त्याने 33.23 च्या सरासरीने 2,659 रन केले, यामध्ये 4 शतकं आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Pujara, South africa, Team india

    पुढील बातम्या