Home /News /sport /

IND vs SA : 12 ओव्हर आणि 48 मिनिटांमध्येच दोन धक्के, टीम इंडिया बॅकफूटवर

IND vs SA : 12 ओव्हर आणि 48 मिनिटांमध्येच दोन धक्के, टीम इंडिया बॅकफूटवर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टला (India vs South Africa 3rd Test) केपटाऊनमध्ये सुरूवात झाली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण विराटचा हा निर्णय टीमच्या चांगलाच अंगलट आला.

पुढे वाचा ...
    केपटाऊन, 11 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टला (India vs South Africa 3rd Test) केपटाऊनमध्ये सुरूवात झाली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण विराटचा हा निर्णय टीमच्या चांगलाच अंगलट आला. मॅचच्या पहिल्या 48 मिनिटांमध्येच भारताला दोन मोठे धक्के लागले. 12 ओव्हरमध्येच टीम इंडियाचे दोन्ही ओपनर पॅव्हेलियनमध्ये परतले. केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) या ओपनिंग जोडीने भारताला 31 रनची सुरूवात करून दिली, पण त्यांना आणखी पुढे जाता आलं नाही. केएल राहुलला ओलिव्हरने 12 रनवर आऊट केलं, तर मयंक अग्रवाल 15 रनवर रबाडाचा शिकार झाला. केएल राहुलने सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये शानदार शतक झळकावलं, पण यानंतर त्याला मोठी खेळी करता आली नाही. या सामन्यासाठी भारतीय टीममध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. विराट कोहली पाठीच्या दुखापतीमुळे दुसरी टेस्ट खेळू शकला नव्हता. आता विराटच्या पुनरागमनामुळे हनुमा विहारीला (Hanuma Vihari) बाहेर बसावं लागलं आहे. विहारीने मागच्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 40 रनची झुंजार खेळी केली होती. तसंच मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी उमेश यादवला (Umesh Yadav) संधी देण्यात आली आहे. सेंच्युरियनमधल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला, यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने कमबॅक केलं, यानंतर सीरिज आता 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आता केपटाऊनची टेस्ट निर्णायक ठरणार आहे. भारताला अजूनपर्यंत एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही, त्यामुळे केपटाऊन टेस्ट जिंकून इतिहास घडवण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. भारतीय टीम केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर.अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Kl rahul, South africa, Team india

    पुढील बातम्या