• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SA 3rd Test Day 3 : शेवटच्या बॉलला भारताला विकेट, पण दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड

IND vs SA 3rd Test Day 3 : शेवटच्या बॉलला भारताला विकेट, पण दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली तिसरी टेस्ट (India vs South Africa 3rd Test) रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. टीम इंडिया तिसऱ्या दिवसाची सुरूवात 57/2 अशी करत आहे. भारताकडे सध्या 70 रनची आघाडी आहे.

 • News18 Lokmat
 • | January 13, 2022, 22:17 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:32 (IST)

  दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का, डीन एल्गार 30 रनवर आऊट, बुमराहला मिळाली विकेट, दिवसाचा खेळ संपला, दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 101/2, विजयासाठी आणखी 111 रनची गरज

  19:43 (IST)

  दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का, मोहम्मद शमीला मिळाली विकेट, एडन मार्करम 16 रनवर आऊट, दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 23/1, विजयासाठी अजून 189 रनची गरज

  18:54 (IST)

  भारताचा 198 रनवर ऑल आऊट, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 रनची गरज, ऋषभ पंत 100 रनवर नाबाद, मार्को जेनसनने घेतल्या 4 विकेट, रबाडा आणि एनगिडीला मिळाल्या प्रत्येकी 3-3 विकेट

  18:42 (IST)

  ऋषभ पंतचं खणखणीत शतक, भारताची आघाडी पोहोचली 200 च्या पार

  18:34 (IST)

  भारताला नववा धक्का, मोहम्मद शमी शून्य रनवर आऊट, मार्को जेनसनला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 189/9, 202 रनची आघाडी

  18:4 (IST)

  भारताला आठवा धक्का, उमेश यादव शून्य रनवर आऊट, कागिसो रबाडाला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 180/8, 193 रनची आघाडी

  17:50 (IST)

  भारताला सातवा धक्का, शार्दुल ठाकूर 5 रनवर आऊट, एनगिडीला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 170/7, आघाडी 183 रनची

  17:28 (IST)

  भारताला सहावा धक्का, आर.अश्विन 7 रनवर आऊट, लुंगी एनगिडीला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 162/6, आघाडी 175 रनची

  17:9 (IST)

  भारताला पाचवा धक्का, विराट कोहली 29 रनवर आऊट, एनगिडीला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 152/5, आघाडी 165 रनची

  केपटाऊन, 13 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली तिसरी टेस्ट (India vs South Africa 3rd Test) रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. टीम इंडिया तिसऱ्या दिवसाची सुरूवात 57/2 अशी करत आहे. भारताकडे सध्या 70 रनची आघाडी आहे. विराट कोहली (Virat Kohli) 14 रनवर तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 9 रनवर नाबाद आहेत. दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या तासामध्ये भारताने दोन्ही ओपनर गमावले. केएल राहुल (KL Rahul) 10 रनवर तर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) 7 रनवर आऊट झाले. मार्को जेनसन आणि कागिसो रबाडा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा 210 रनवर ऑल आऊट केला, ज्यामुळे टीम इंडियाला 13 रनची आघाडी मिळाली. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) धमाकेदार कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेऊन दिली नाही. दिवसाच्या दुसऱ्याच बॉलला बुमराहने एडन मार्करमला बोल्ड केलं. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 42 रन देऊन 5 विकेट घेतल्या. तर उमेश यादव आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. शार्दुल ठाकूरला 1 विकेट घेण्यात यश आलं. केपटाऊनमध्ये सुरू असलेली या टेस्टच्या पहिल्या दोन्ही दिवशी 11-11 विकेट गेल्या, त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळही रोमांचक होण्याची शक्यता आहे. विराट आणि पुजारा तिसऱ्या दिवशी भारताला सावध सुरूवात करून द्यायचा प्रयत्न करतील, तर दक्षिण आफ्रिकेचे बॉलर्स सुरुवातीलाच धक्के देण्यासाठी आग्रही असतील. रहाणे आणि ऋषभ पंतचा फॉर्म टीमसाठी चिंतेचा विषय आहे, त्यामुळे आफ्रिकेला तिसऱ्या दिवशी सुरुवातीलाच विकेट मिळाली तर भारतासाठी अडचणी वाढू शकतात. सेंच्युरियनमधल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला, यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने कमबॅक केलं, यानंतर सीरिज आता 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आता केपटाऊनची टेस्ट निर्णायक ठरणार आहे. भारताला अजूनपर्यंत एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही, त्यामुळे केपटाऊन टेस्ट जिंकून इतिहास घडवण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.