Home /News /sport /

IND vs SA : 'देशच आमच्याविरोधात खेळतोय', विराट स्टम्प माईकसमोर येऊन बोलला, वादग्रस्त VIDEO VIRAL

IND vs SA : 'देशच आमच्याविरोधात खेळतोय', विराट स्टम्प माईकसमोर येऊन बोलला, वादग्रस्त VIDEO VIRAL

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टच्या (India vs South Africa 3rd Test) तिसऱ्या दिवशी मोठा वाद पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गार (Dean Elgar) याच्या एलबीडब्ल्यूवरून हा वाद (DRS Controversy) सुरू झाला.

पुढे वाचा ...
    केपटाऊन, 13 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टच्या (India vs South Africa 3rd Test) तिसऱ्या दिवशी मोठा वाद पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गार (Dean Elgar) याच्या एलबीडब्ल्यूवरून हा वाद सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग सुरू असताना 21 व्या ओव्हरचा अश्विनने टाकलेला चौथा बॉल एल्गारच्या पॅडला लागला, यानंतर भारताने अपील केलं आणि अंपायर मरेस इरासमस यांनी एल्गारला आऊट दिलं. एल्गारने मात्र डीआरएस (DRS Controversy) घेतल्याचा निर्णय घेतला. एल्गारने डीआरएस घेतल्यानंतर मैदानातल्या मोठ्या स्क्रीनवर जे दिसलं ते पाहून फक्त टीम इंडियाच नाही तर अंपायरही धक्क्यात होते. पण विराट कोहलीने केलेलं वक्तव्य वादात सापडलं आहे. यामुळे त्याच्यावर आयसीसीकडून कारवाई होण्याचीही शक्यता आहे. संपूर्ण देशच आमच्याविरुद्ध खेळत आहे, असं विराट कोहली म्हणाला. विराटच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकीकडे विराटने हे वक्तव्य केलेलं असतानाच अंपायर मरेस इरासमस यांनीही डोकं हलवलं आणि हे अशक्य आहे, असं वक्तव्य केलं. तर अश्विनने प्रसारण करणाऱ्या सुपरस्पोर्ट चॅनलवरच निशाणा साधला. जिंकण्यासाठी चांगला मार्ग शोधा, सुपरस्पोर्ट असं अश्विन स्टम्प माईकच्या जवळ येऊन म्हणाला. यानंतर 28 व्या ओव्हरच्या अखेरच्या बॉललाही भारताने एल्गारच्या एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं, यानंतरही विराटने डीआरएसवरून टोमणा मारला. आता डीआरएसमध्ये बॉल खांद्याच्या वरून जातोय, असं दिसेल, असं विराट म्हणाला. एल्गारच्या एलबीडब्ल्यूवरून वाद निर्माण झाला असला तरी अखेर भारताला त्याची विकेट घेण्यात यश आलं. बुमराहने एल्गारला 30 रनवर आऊट केलं. बुमराहने लेग स्टम्पवर टाकलेला बॉल मारण्याचा प्रयत्न एल्गारने केला, पण विकेट कीपर ऋषभ पंतने डाव्या बाजूला उडी मारून कॅच पकडला. यावेळीही अंपायरनी एल्गारला आऊट दिलं नाही, अखेर विराटने डीआरएस घेतला. डीआरएसमध्ये एल्गारच्या बॅटला बॉल लागल्याचं निष्पन्न झालं आणि विराटने टीम इंडियासोबत जोरदार जल्लोष केला. एल्गारची विकेट गेल्यानंतर दिवसाचा खेळ संपवण्यात आला. दिवाअखेरीस दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 101/2 एवढा आहे. विजयासाठी त्यांना आणखी 111 रनची गरज आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या