मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : बॅटिंगमध्ये अपयशी, फिल्डिंगमध्येही फेल! पुजाराने सोडला 'कॅच ऑफ द सीरिज'

IND vs SA : बॅटिंगमध्ये अपयशी, फिल्डिंगमध्येही फेल! पुजाराने सोडला 'कॅच ऑफ द सीरिज'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी (India vs South Africa) मॅच जिंकण्यासाठी भारताला लवकर विकेट घेणं गरजेचं होतं, पण यात भारताला अपयश आलं आणि तिसरी टेस्ट भारताच्या हातातून निसटली. सप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) इनिंगची 40 वी ओव्हर टाकत होता, तेव्हा चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) सोपा कॅच सोडला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

केपटाऊन, 14 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी (India vs South Africa) मॅच जिंकण्यासाठी भारताला लवकर विकेट घेणं गरजेचं होतं, पण यात भारताला अपयश आलं आणि तिसरी टेस्ट भारताच्या हातातून निसटली. पहिल्या सत्रात टीम इंडियाला कीगन पीटरसनची विकेट मिळाली असली तरी तोपर्यंत फार उशीर झाला होता. भारताने दिलेल्या 212 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पीटरसन 82 रनवर आऊट झाला. पण चेतेश्वर पुजाराने त्याला जीवनदान दिलं. मॅचच्या पहिल्या इनिंगमध्येही पीटरसनने 72 रन केले होते.

मॅचच्या चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) इनिंगची 40 वी ओव्हर टाकत होता, तेव्हा चौथ्या बॉलला पीटरसनच्या बॅटच्या कडेला बॉल लागला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पुजाराकडे (Cheteshwar Pujara) गेला, पण त्याने अत्यंत सोपा असा कॅच सोडला. पीटरसनचा कॅच सुटला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला आणखी 86 रनची गरज होती आणि पीटरसन 59 रनवर खेळत होता.

चेतेश्वर पुजाराला या सीरिजमध्ये बॅटनेही चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याने 3 टेस्टच्या 6 इनिंगमध्ये 21 च्या सरासरीने 124 रन केले, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये पुजाराला एकही शतक करता आलेलं नाही. पुजाराशिवाय अजिंक्य रहाणेही (Ajinkya Rahane) या सीरिजमध्ये अपयशी ठरला. त्याने 23 च्या सरासरीने 136 रन केले. आता दोन्ही खेळाडूंना भविष्यात टीम इंडियात संधी मिळणं अवघड आहे.

रोहित शर्मा दुखापतीनंतर पुनरागमन करेल, तसंच श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि हनुमा विहारीदेखील (Hanuma Vihari) त्यांच्या संधीची वाट पाहत आहेत, त्यामुळे विराट कोहली आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) या खेळाडूंवर विश्वास दाखवू शकतात.

First published:

Tags: Pujara, South africa, Team india